उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय, अमोल मिटकरींचा सदाभाऊंना टोला

उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय, अमोल मिटकरींचा सदाभाऊंना टोला

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर (Rajya Sabha elections) विधानपरिषदेच्या निवडणूक येत्या २० जूनला होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. भाजप पुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शेवटच्या पाच मिनिटांमध्ये आपला उमेदवारी अर्ज घेतला. त्यामुळे त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून खिल्ली उडवली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून सदाभाऊंना टोला लगावला आहे.

उतारवयात आराम करता यावा म्हणूनच…

अमोल मिटकरी यांनी ट्विट करत सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे. सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणुनच फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय, मात्र आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही. भाऊ त्या फडणवीसांना सांगा, म्हणावं, “म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय. आणखी दोन पावलं माग येऊन सन्या गुमान बसलं, असं ट्विट अमोल मिटकरींनी केलं आहे.

भाजपने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांचं नाव नसल्याने ८ जूनला अमोल मिटकरींनी एक ट्विट केलं होतं. बेवजह नही रोता ईश्क मे कोई गालिब, जिसे खुद से बढ कर चाहो, वो रुलाता जरूर हैं ll, असं ट्विट करत त्यांनी भाजप पुरस्कृत आमदारांवर शायरीद्वारे टीका केली होती.

सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज का मागे घेतला?

सदाभाऊ यांनी उमेदवारी अर्ज का मागे घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पक्षात सर्वांशी चर्चा करून सदाभाऊंचा अर्ज मागे घेण्यात आला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजपचे पाचवे उमेदवार असलेले प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी भाजपला कसरत करावी लागणार आहे. निवडणूक सोपी नाहीये. आम्ही सर्व गणितं आखलेली आहेत. पाचवा उमेदवार आमचाच निवडून येईल, असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : ‘विधान परिषदेसाठी मतदान करायचं असेल तर नवी याचिका दाखल करा’


 

First Published on: June 13, 2022 8:11 PM
Exit mobile version