Amravati violence: भाजपच्या अमरावती बंदला हिंसक वळण, दुकाने, वाहनांची तोडफोड

Amravati violence: भाजपच्या अमरावती बंदला हिंसक वळण, दुकाने, वाहनांची तोडफोड

त्रिपुरामध्ये मुस्लिमांवरील हल्ले आणि मोहम्मद पैंगबराबद्दल वापरण्यात आलेल्या अपशब्दाचे पडसाद महाराष्ट्रात दिसून आले होते. या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर आजा शनिवारीभाजपकडून आवाहन करण्यात आलेल्या अमरावती बंदला आज हिंसक वळण मिळाले. अमरावतीतील राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने जमलेल्या आंदोलकांकडून दुकानांवर दगडफेक करताना तसेच वाहनांचीही तोढफोड करण्याचे प्रकार समोर आले. अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा दिसीन आला खरा, पण जमावाच्या मोठ्या संख्येपुढे मात्र पोलिसही हतबल झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी जमावाने मोठ्या संख्येने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. भाजपच्या अमरावती बंदच्या आवाहनामुळे आज संपुर्ण शहरातील दुकाने बंद होती. पण बंद असलेल्या दुकानांवरही आंदोलकांकडून दगडफेकीचे प्रकार दिसून आले. पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यानंतरही आंदोलकांचा जमाव पांगवण्यात पोलिसांना अपयश आले.

राज्याचे गृहमंत्री नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून का असे आवाहन केले होते. तसेच संयम बाळगावा असे आवाहन सर्व हिंदू व मुस्लिमांना केले होते. पण भाजपच्या आज अमरावती बंदमध्ये पुन्हा एकदा आंदोलनकर्त्यांचे हिंसक रूप दिसून आले. शेकडोच्या जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. त्यामुळे वाहनांचे तसेच बाजारपेठेतील दुकानांचे मोठे नुकसान झाले. आंदोलनकर्त्यांनी यावळी जोकदार घोषणाबाजीही केली. एसआरपीएफच्या तुकड्यांची मदत या जमावाला पांगवण्यासाठी बोलावण्यात आल्याची माहिती अमरावतीच्या पालकमंत्री आणि कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली.

राजकीय परिस्थितीचा फायदा घेणे योग्य नाही – दिलीप वळसे पाटील

आवश्यक पोलिस बळ देण्यात आले आहे. पालकमंत्र्यांशी झालेल्या बोलण्यानुसार राजकीय पक्षांशी बोलण्याचे आवाहन मी केले आहे. हिंसेतून काहीही करता येणार नाही, त्यामुळे आपण टाळायला हवे. अधिक पोलिसांची कुमव पाठवण्यासाठी राज्याच्या पोलिस महासंचालकांना सूचना देण्यात आले आहेत. त्यामुळे नजीकच्या परिसरातून पोलिस दल पाठवले जात आहे. अतिशय दुर्दैवी घटना असल्याचेही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. बंदच्या आवाहनात आक्रमक तरूणांचा मॉब दिसतोय. राजकीय परिस्थितीचा फायदा घेणे योग्य नाही, असेही म्हणाले. अमरावतीच्या शुक्रवारच्या मोर्चात गर्दी वाढली असेही गृहमंत्री म्हणाले. संपुर्ण प्रकरणात चौकशी करणार असून दोषींना पाठीशी घातले जाणार नाही. आता शांततेसाठी आवाहन करत आहे. शातंता प्रस्थापित करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. दोषींना नक्कीच शिक्षा जाईल असेही ते म्हणाले.

राजकीय पोळी भाजण्यासाठी हिंसाचार – यशोमती ठाकूर

संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरिकेटींग करण्यात आले होते. पण पोलिसांची मोठी कुमक उपलब्ध झाल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. जिथे हिंसक वळण लागले होते त्याठिकाणी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना यश आले. अमरावती राजकमल चौकातून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अनियंत्रित झालेल्या मॉबला पोलिसांनी एकत्रित ठिकाणी आणण्यासाठीचे प्रयत्न केले. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही समोर आल्या. मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या आंदोलकांकडून सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान करण्यात आले. काही ठिकाणी हॉस्पिटलवर हल्लादेखील करण्यात आला. काही ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही करण्यात आला. राजकीय वळण देण्याचा प्रयत्न होतोय. अमरावतीला अशा भांडणांची गरज नाही. अमरावतीत राजकीय वळण देण्याचा कट महाराष्ट्रात होतोय. महाराष्ट्राचे वातावरण मलिक करण्याचा प्रयत्न होतोय. कालही ज्यांनी हिंसाचार केला तेदेखील चुकीचे आहे. त्या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला. हिंदू असो वा मुस्लिम कोणत्याही दोषीला हिंसाचार प्रकरणात सोडल जाणार नाही. या प्रकरणात सामान्य माणसाला वेठीस धरू नये असेही त्या म्हणाल्या. तसेच ज्यांना राजकीय पोळी भाजायची आहे त्यांच्याकडूनच हे प्रयत्न होत आहेत. अमरावती जाळू नका असेही आवाहन त्यांनी केले.

हिंसाचाराच्या मुळाशी कोण आहे लवकरच कळेल – शंभू राजे देसाई

हिंसाचाराच्या मुळाशी कोण आहे ? कोण करायला लावत आहे ? हे लवकरच महाराष्ट्रातील लोकांना कळेल, अशी प्रतिक्रिया शंभूराजे देसाई यांनी दिली. जनतेला विनंती करतो आहे की आमचे पोलिस दल सतर्क आहे. कुणीही अशा भूलथापांना बळी पडू नका. माथी भडकवण्याचे काम करत आहे त्याला बळी पडू नये असेही आवाहन करण्यात आले. महाराष्ट्रातून पुरेसा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सर्व बाजूंनी पोलिस यंत्रणा काम करत आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ असल्याचेही ते म्हणाले. गृहमंत्र्यांनीही सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. पोलिस दल कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तयार आहे, असेही ते म्हणाले.


मालेगाव, अमरावती, नांदेडमध्ये मुस्लिमांच्या मोर्चाला हिंसक वळण

First Published on: November 13, 2021 11:00 AM
Exit mobile version