ऐ भोगी !…काहीतरी शिक आमच्या योगींकडून, अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

ऐ भोगी !…काहीतरी शिक आमच्या योगींकडून, अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

राज्यात भोंग्यांवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवल्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!, असं ट्विट राज ठाकरेंनी करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना ट्विट करत टोला लगावला आहे.

ऐ भोगी !…काहीतरी शिक आमच्या योगींकडून, असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से!, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलंय. तसेच Maharashtra आणि thursdayvibes हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.

राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. उत्तर प्रदेशातील धार्मिकस्थळांवरील, विशेषतः मशिदींवरील भोंगे उतवरल्याबद्दल योगी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!, असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तर ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. मागील चार दिवसांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.


हेही वाचा : BJP NCP Alliance : राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक, भाजप-राष्ट्रवादी युतीवर भाजप नेत्यांचं मोठं वक्तव्य


 

First Published on: April 28, 2022 5:56 PM
Exit mobile version