भायखळ्यात ज्येष्ठांसाठी मनोरंजन सेंटर, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारणार

भायखळ्यात ज्येष्ठांसाठी मनोरंजन सेंटर, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारणार

Entertainment Center in Byculla | मुंबई – मुंबई महापालिका भायखळा येथे सहा कोटी रुपये खर्चून ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन सेंटर, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सेवा उपलब्ध करणार आहे. त्यामुळे भायखळा परिसरातील ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई महापालिका लहान मुलांना उद्यानात खेळण्यासाठी मनोरंजन खेळणी उपलब्ध करते. महिला व ज्येष्ठ नागरिकांना विविध सेवासुविधा उपलब्ध करते. गोरेगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम उभारणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका आणि ज्येष्ठ नागरिकांना मनोरंजन केंद्रही उपलब्ध करते. याच अनुषंगाने भायखळा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी एकांत उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अभ्यासिकाही उपलब्ध करणार आहे.

हेही वाचा – कोरोना क्वारंटाइन सेंटर घोटाळा : मुंबई पालिकेला ईडीचा संसर्ग, वरिष्ठांची चौकशी!

तसेच, ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन व्हावे यासाठी शिवदास चाप्सी मार्ग येथील एका प्लाॅटवर तळ मजला अधिक दोन मजली इमारत बांधण्यात येणार आहे. एका मजल्यावर अभ्यासिका तर आणखीन एका मजल्यावर ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन केंद्र उभारण्यात येणार आहे. या कामासाठी पालिका सहा कोटी वीस लाख रुपये खर्च करणार आहे.


या कामांसाठी पालिकेकडून टेंडरप्रक्रिया राबविण्यात येत आहे. टेंडर प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या कंत्राटदाराला अभ्यासिका व मनोरंजन केंद्र उभारण्याचे काम देण्यात येणार आहे.

हेही वाचा Metro 2A ची वैशिष्ट्ये : ३५ किमीपर्यंत ३० स्थानके, मेट्रो १ ही जोडणार

First Published on: January 13, 2023 9:26 PM
Exit mobile version