घरफोटोगॅलरीMetro 2A ची वैशिष्ट्ये : ३५ किमीपर्यंत ३० स्थानके, मेट्रो १...
Metro 2A ची वैशिष्ट्ये : ३५ किमीपर्यंत ३० स्थानके, मेट्रो १ ही जोडणार
Metro 2 A | मेट्रो २ ए ही मेट्रो १ला डी.एन नगर मेट्रो स्थानकावर आणि अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानकावर जोडण्यात आली आहे. मेट्रो २ ए मध्ये एकूण ३० स्थानके असणार आहेत. अंधेरी पश्चिम ते गुंदवलीपर्यंत ३५ किमीपर्यंत ही मेट्रो धावणार आहे.
Metro 2 A | मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) आणि मार्ग २अ (टप्पा-२)चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी रोजी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंधेरी परिसरातील गुंदवली स्थानक येथे भेट देऊन लोकार्पण सोहळ्याची तसेच तेथील सुविधांची पाहणी केली. मेट्रो २ अ स्थानकांची आणि या मार्गावरून धावणाऱ्या मेट्रोची सफर आपण करूयात. मेट्रो २ ए ही मेट्रो १ला डी.एन नगर मेट्रो स्थानकावर आणि अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानकावर जोडण्यात आली आहे. मेट्रो २ ए मध्ये एकूण ३० स्थानके असणार आहेत. अंधेरी पश्चिम ते गुंदवलीपर्यंत ३५ किमीपर्यंत ही मेट्रो धावणार आहे.
सर्व फोटो – दीपक साळवी
मुंबई मेट्रो मार्ग २अ अंधेरी प. ते दहिसर पूर्व कॉरिडॉर मुंबईच्या पश्चिमेकडील भागांसाठी अत्यंत उपयुक्त असा मार्ग आहे. मुंबई मेट्रो मार्ग २अ सुद्धा टप्पा-१ आणि टप्पा-२ या दोन पूर्ण केली आहे.
मुंबई मेट्रो मार्ग २अ (टप्पा-१) हा ९.८२८ किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे ज्यामध्ये ९ स्थानके आहेत (डहाणुकरवाडी ते दहिसर पूर्व).
मुंबई मेट्रो मार्ग २ अ (टप्पा-१) मध्ये (१) दहिसर पूर्व (२) आनंद नगर (३) कांदरपाडा (४) मंडपेश्वर (५) एकसर (६) बोरिवली प. (७) पहाडी एकसर (८) कांदिवली प. (९) डहाणुकरवाडी या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.
मुंबई मेट्रो मार्ग २अ (टप्पा-२) हा ८.७६८ किमी लांबीचा एलिव्हेटेड मार्ग आहे ज्यामध्ये स्थानके आहेत (वळनाई ते अंधेरी प.), मुंबई मेट्रो मार्ग २अ (टप्पा-२) मध्ये (१) वळनई (२) मालाड प. (३) लोअर मालाड (४) पहाड़ी गोरेगाव (५) गोरेगाव प. (६) ओशीवरा (७) लोअर ओशीवरा (८) अंधेरी प. या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.
मेट्रोकडून एकुण ११ ट्रेन्स या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गावर चालवण्यात येणार आहेत. प्रत्येक ट्रेनला ६ कोचेस आहेत. तर ११ ट्रेन्सची एकुण कोचेसची संख्या ६६ इतकी आहे.
सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. साधारण ११ मिनिटांनी एक ट्रेन अशा मेट्रोच्या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
या ट्रेनची प्रवासी क्षमता ही २२८० प्रवासी प्रति ट्रेन इतकी आहे. तर प्रत्येक कोचनिहाय ५० जणांची क्षमता असणार आहे.
ताशी ७० किमी वेगाने या ऑपरेट करण्यासाठी एमएमआरडीएला परवानगी मिळाली आहे. तर यापुढच्या काळात ताशी ८० किमी वेगाने ट्रेन ऑपरेट करण्यासाठी परवानगी मिळू शकते अशी माहिती एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी दिली आहे.
महिलांसाठी विशेष कोचही असणार आहे.
एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनीही आज मेट्रोची पाहणी केली.