काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसूनच राष्ट्रवादीचा जन्म, शिवसेना नेते अनंत गीते आक्रमक

काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसूनच राष्ट्रवादीचा जन्म, शिवसेना नेते अनंत गीते आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेना कधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची होऊ शकत नाही असे शिवसेना नेते अनंत गीते यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला असल्याचा घणाघात अनंत गीते यांनी केला आहे. सत्तेतील महाविकास आघाडी ही केवळ तडजोड केली असल्याचे गीते यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपले नेते नसून आपले गुरु फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत. सरकार आघाडी सांभाळेल, तुमची आपली जबाबदारी काय आहे तर आपल्याला गाव सांभाळायचा असून आपण फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे असे वक्तव्य शिवसेने नेते अनंत गीते यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेते अनंत गीतेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. गीते एका कार्यक्रमात म्हणाले की, शिवसेना नेता या नात्याने व्यासपीठावरुन बोलतो आहे. कुठलेही राजकीय भाषण करणार नाही. शिवेसना काय हेच फक्त सांगणार, शिवसैनिकाची जबाबादारी काय आहे हेच फक्त सांगणार आहे. राज्यात सरकार आपलं आहे. आपलं कशासासाठी म्हणायचे तर आपला मुख्यमंत्री आहे. बाकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपलं नाही. महाविकास आघाडीचे सरकार आहे की, शिवसेनेचे सरकार आहे. तर आघाडीचे सरकार आहे. सरकार आघाडी सांभाळेल, तुमची आपली जबाबदारी काय आहे तर आपल्याला गाव सांभाळायचा आहे. हे गाव सांभाळत असताना आघाडीचा विचार नाही तर फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे. आघाडी आघाडी बघून घेल असे वक्तव्य अनंत गीते यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे जन्म पाठीत खंजीर खुपसून

अनंत गीतेंनी पुढे म्हटलं आहे की, महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन घटक पक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष काँग्रेसच आहेत. तरी एकमेकांचे तोंड बघत नव्हते, यांचं एकमेकांचे जमतंय का? यांच्या विचारांची सांगड बसते का? यांचा विचार एक आहे का? तर जर हो दोन काँग्रेस एकविचाराची होऊ शकत नाही तर शिवसेना कदापी एकविचाराची होणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत. मुळात राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खुपसून झाला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत तर त्यांच्या विचाराचे आम्ही कदाही होऊ शकत नाही असे शिवसेना नेते अनंत गीते यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : महंत नरेंद्र गिरींचा मृत्यू संशयास्पद, CBI चौकशी करुन सत्य बाहेर आणा, राऊतांची मागणी


 

First Published on: September 21, 2021 11:06 AM
Exit mobile version