…आणि फडणवीसांना आठवले बाळासाहेब; व्हिडीओ शेअर करत दिला आठवणींना उजाळा

…आणि फडणवीसांना आठवले बाळासाहेब; व्हिडीओ शेअर करत दिला आठवणींना उजाळा

बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे त्याच निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (dcm devendra fadnavis) यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत असताना फडणवीसांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा बाळासाहेबांना भेटलो होतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत बाळासाहेबांना अभिवादन केले.

नेमकं काय म्हटले आहे व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस (dcm devendra fadnavis) म्हणाले, मला आठवतं आहे की मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो होतो तेव्हा आमदारांची एक बैठक व्हायची. त्यात बाळासाहेब बोलायचे आणि त्यातून आमदारांचा जो काही जोर चढायचा ते मी स्वतः अनुभवलं आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात करंट होता. त्यांच्या प्रत्येक वाक्यागणिक समोरच्या माणसामध्ये तो करंट जायचा. त्यातून त्या माणसालाही तो पेटवायचा. ही जी काही एक प्रचंड अशा प्रकारची नेतृत्वक्षमता त्यांच्याकडे होती. एकीकडे वज्राहून कडक अशा प्रकारची भूमिका मांडणारे बाळासाहेब होते. तर दुसरीकडे विशाल जलाशयाप्रमाणे किंवा निर्झर झऱ्यासारखे प्रेम करणारेही बाळासाहेब होते. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत राहो आणि ज्या विचारांनी त्यांनी आजन्म कार्य केले त्या विचारांनी आणि त्याच गतीने आम्ही काम करत राहू.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी केली. त्यावेळी स्मारकावरून आम्ही कोणतेही राजकारण करणार नाही असे म्हटले. भाजपचे नेते प्रसाद लाड (prasad lad) यांनी हे स्मारक सरकारने ताब्यात घेतले पाहिजे अशी मागणी केली होती. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिले.

हे स्मारक तयार करण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री असताना कायदा करुन ही जागा हस्तांतरित केली होती. एमएमआरडीएमधूनही मान्यता दिली. त्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन दिला. त्यांनतर पुढे एकनाथ शिंदे यांच्याकडे हा विभाग आला, त्यांनीही या कामाला निधी उपलब्ध करुन देत कामाला गती दिली. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच हे काम पूर्णत्वास जात आहे. आम्हाला हे काम पूर्ण होऊन ते जनतेला समर्पित करण्यामध्ये जास्त रस आहे. तर त्या समितीमध्ये कोण आहे यात रस नाही. असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हे ही वाचा –  राष्ट्रगीताऐवजी दुसरेच गाणे वाजले; राहुल गांधींच्या सभेतील व्हिडीओ व्हायरल

First Published on: November 17, 2022 2:20 PM
Exit mobile version