आगामी निवडणुकीत प्रत्येक पक्षाला त्यांची जागा दाखवून देऊ; अनिल परबांचे विरोधकांना आव्हान

आगामी निवडणुकीत प्रत्येक पक्षाला त्यांची जागा दाखवून देऊ; अनिल परबांचे विरोधकांना आव्हान

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजय निश्चित झाला. या निवडणूकीत लटकेंचा विजय झाला तरी या नोटाला जवळपास 9 हजार मतं पडली आहेत. याच कारणावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भाजपावर टीकास्त्र डागले आहे. भाजपने एका बाजूने उमेदवार मागे घेतला आणि दुसऱ्या बाजूने नोटाचा प्रचार केला असा आरोप अनिल परब यांनी केला आहे. तसेच भाजपच्या जागर मुंबईचा या अभियानावरही टीका केली, यासह आगामी निवडणुकीत प्रत्येक पक्षाला जागा दाखवून देऊ असले आव्हान अनिल परब यांनी विरोधकांना दिले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतांसाठी तुष्टीकरण.. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि परिवारवाद… या विरोधात भाजपाने एल्गार पुकारला असून मुंबईत “जागर मुंबईचा” हे अभियान सुरु करण्यात येत आहे. हे अभियान मातोश्रीच्या अंगणातून म्हणजे वांद्रे येथून सुरुवात होत आहे. ज्यावर अनिल परब म्हणाले की, शिवसेनेच्या विरोधातील जेवढे पक्ष आहेत ते मातोश्रीच्या अंगणात येतात, कारण मातोश्रीच्या अंगणात प्रसिद्धी चांगली मिळते. अशाप्रकाराचा प्रयोग पहिल्यांच झाला नाही, यापूर्वीही मातोश्रीच्या अंगणात बंजडखोरीचे प्रकार झाले, मातोश्रीच्या अंगणातून दंड थोपटून आव्हान दिलं गेलं, आव्हान दिलं त्यांना चारीमुंड्डया चित केलं. विरोधक आहेत त्यांचा तो अधिकार आहे. मात्र येणाऱ्या निवडणूक आम्ही प्रत्येक पक्षाला त्यांची जागा दाखवून देऊ असं आव्हान परब यांनी दिले.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून भाजपने आपला उमेदवार मागे घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आवाहन केले होते, यावेळी महाराष्ट्राची संस्कृती म्हणून भाजपने उमेदवार मागे सुद्धा घेतला, उमेदवारांनी त्यांचे आभारही मानले. एका बाजूने उमेदवार मागे घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने नोटाचा प्रचार करायचा हे काही योग्य नाही. भाजपने अशा उमेदवाराला पाठींबा द्यायला पाहिजे होता, मात्र त्यांनी पाठिंबा दिला नव्हता. मात्र त्यांनी नोटांचा जो प्रचार केला ती गोष्ट खटकणारी आहे, असही अनिल परब म्हणाले.


महापालिका निवडणुकीसाठी भाजपने फुंकले रणशिंग; भाजपाच्या ‘जागर मुंबईचा’ला वांद्रे पूर्वमधून सुरुवात

First Published on: November 6, 2022 1:47 PM
Exit mobile version