अंधेरी पोटनिवडणूक मशाल चिन्हावरच लढणार, आमची निष्ठा बाळासाहेबांसोबतचं; ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

अंधेरी पोटनिवडणूक मशाल चिन्हावरच लढणार, आमची निष्ठा बाळासाहेबांसोबतचं; ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर आता रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेत पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या जागेसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ऋतुजा लटके यांच्या महापालिका प्रशासनाच्या नोकरीवरून सध्याच्या राजकीय वाद सुरु आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्याप मंजुर न झाल्याने त्यांच्या निवडणुक लढतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या राजकीय वादावर आता ऋतुजा लटके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आता निवडणूक लढणार तर मशाल या निवडणूक चिन्हावरच लढणार असून माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे

ऋतुजा लटके एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या की, माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नाही, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलेले नाही. अंधेरी पोटनिवडणूक मी मशाल चिन्हावरचं लढणार आहे. आमची निष्ठा उद्धव ठाकरे साहेबांसोबतचं आहे. माझे पती रमेश लटके यांचीही निष्ठा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंसोबत होती.

आता मी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले आहे. यावेळी त्यांना राजीनाम्यासंदर्भात पुन्हा एकदा विनंती करणार आहे की, मला आजच्या आज राजीनामा देण्यात यावा. अशी माहिती ऋतुजा लटके यांनी दिली.

मला अशी माहिती देण्यात आली की, सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. फक्त एक सही शिल्लक आहे. मी निवडणूक लढणार तर ती मशाल या चिन्हावरचं लढणार असल्याचेही ऋतुजा लटके यांनी पुन्हा एकदा नमुद केले.


काँग्रेसने वीर सावरकरांचा खुळखुळा केला; ‘सामना’तून ठाकरे गटाचा हल्लाबोल


First Published on: October 12, 2022 3:46 PM
Exit mobile version