सदावर्तें अहवालाच्या १२ आठवड्यांची मुदत कमी करु शकणार का? त्यांनी कोर्टात लढावं- अनिल परब

सदावर्तें अहवालाच्या १२ आठवड्यांची मुदत कमी करु शकणार का? त्यांनी कोर्टात लढावं- अनिल परब

“गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सांगितले की, एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण होऊनच दाखवतो. १२ आठवड्यांची मुदत असताना सदावर्ते ही मुदत कमी करु शकतात का? सदावर्तेंनी कोर्टात लढावे. असं आव्हान परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.

“कामगारांना न्याय मिळवून याबाबत आमचं काहीचं दुमत नाही. कोर्टाने २० दिवसात प्राथमिक अहवाल सादर करा असं सांगितले. त्यामुळे २० डिसेंबरला शासनाला प्राथमिक अहवाल सादर करायचा आहे. ही आत्ता न्यायालयीन प्रक्रिया आहे. सदावर्ते यांना न्यायालयीन प्रक्रियेचा अंदाज आहे. त्यामुळे ते बाहेर काय बोलतात आणि कोर्टात काय चालतं यात फरक आहे.” असं अनिल परब म्हणाले आहे.

“सदावर्तेंना  संप लांबवायचा असेल तर यात एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान”

“१२ आठवडे सदावर्तेंना हा संप लांबवायचा असेल तर ते एसटी चालकांचे नुकसान करत आहेत. जर आमचं कायदेशीर काय चुकतं असेल तरी कान धरावेत याची कोणालाही मुभा आहे. परंतु अडवणूक करुन दिशाभूल करुन आणि काल कोणीतरी तरी अशी बातमी पसरवली की, एसटीचा संप जर ६० दिवस चालला तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. जर अशाप्रकारच्या अफवा पसरून संप लांबवायचा असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी सावध! कोणत्या कायद्याच्या पानावर असं लिहिले आहे ते पान तरी एसटी कर्मचाऱ्यांना दाखवा. असं आव्हानही अनिल परब यांनी दिले आहे.

“एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाईल याची जबाबदारी कोण घेणार?”

“अशाप्रकारे काही तरी सांगून एसटी कामगारांना ते अधोगतीकडे घेऊन जात आहेत. अशाप्रकारच्या अफवा व्हॉट्सअपवरून पसरवल्या जात आहे, व्हॉट्सअपवर अफवा पसरवायच्या एसटी कर्मचाऱ्यांना खोट्या शपथा द्यायच्या, एसटी कामगारांना भुलथापा द्यायच्या. कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाईल याची जबाबदारी कोण घेणार.” असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला.


ST workers Strike : एसटी संपावर परिवहन मंत्र्यांचे कामगारांना आवाहन, म्हणाले…भडकवणाऱ्यांच्या


 

First Published on: November 26, 2021 1:00 PM
Exit mobile version