ईडीच्या नोटीसवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ही अपेक्षा…

ईडीच्या नोटीसवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ही अपेक्षा…

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल देशमुख यांना ईडीने नोटीस बजावली आहे. ३१ ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीने पाठवलेल्या नोटीसवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अनिल परब यांनी म्हटलं आहे की, आपेक्षा होती त्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन ईडीच्या चौकशीस हजर राहण्याबाबत निर्णय घेणार आहे. ईडीची नोटीस संध्याकाळी मिळाली मात्र या नोटीसमध्ये कोणत्या प्रकरणात चौकशीला बोलवले आहे याबाबत काही माहिती देण्यात आली नाही केवळ चौकशीचा भाग म्हणून हजर राहण्याचे आदेश दिले असल्याचे अनिल परब यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपच्या वादामुळे नोटीस बजावली असल्याचे राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे.

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी अनिल परब यांनी म्हटलं आहे की, ईडीची नोटीस संध्याकाळी भेटली आहे. ३१ ऑगस्ट रोजी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. यामध्ये कुठल्याही प्रकरणाचा विशेष असा उल्लेख केला नाही. यामुळे कशा करता ही नोटीस पाठवण्यात आली आहे याबाबत काही सांगता येत नाही. नोटीसमध्ये विषय सांगितला नसल्यामुळे काही समजले नाही असे अनिल परब यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अनिल परब यांनी म्हटलं आहे की, या नोटीसमध्ये फक्त चौकशीचा भाग असल्याचे सांगितले आहे. साधारण आम्हाला अपेक्षा होती त्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर देऊ. कारण जाणून घेईपर्यंत काही उत्तर देणार नाही. कायदेशीर बाबींचा अभ्यास करुन चौकशीला हजर राहण्याचा निर्णय घेण्यात येईल असे अनिल परब यांनी म्हटलं आहे.

कितीही नोटीसा पाठवा आम्ही डगमगणार नाही : राऊत

भाजपच्या भाषेत सांगायचे तर टायमिंग बघा, घटनाक्रम समजून घ्या. रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना अटक झाली. त्या जिल्ह्याचे अनिल परब हे पालकमंत्री आहेत आणि ती जन आशीर्वाद यात्रा संपताच ताबडतोब रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना वरच्या सरकारचे लव्ह लेटर आले. येऊ द्या. कायदेशीर लढाई आहे, आम्ही काय कुणाल धमक्या देणार नाही, आम्ही नॉर्मल माणसं आहोत. नॉर्मल माणसं कायदेशीर लढाई लढतात आणि जे असत्य आहे, जे खोटं आहे, बनावट आहे त्याचा पर्दाफाश करतात. आमच्या लढाईला नैतिकतेचे बळ आहे. आम्ही गुन्हेगार नाही. तुम्ही आमच्यावर हे सगळे लादता आहात. पण असे तुम्ही कितीही कागद पाठवा, हरकत नाही. तुम्ही करत रहा, आम्ही लढत राहू. महाराष्ट्राची आणि शिवसेनेची लढण्याची परंपरा आहे. अशा कितीही नोटिसा आम्हाला पाठवल्या, कितीही खोटेनाटे आरोप केले, चिखलफेक केली तरी शिवसेना, शिवसेनेचे मंत्री, आम्ही सगळे नेते अजिबात डगमगणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

किरीट सोमैय्यांचा आरोप 

संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. की कायद्याने लढू हो पण तुमचे सगळे नेते काही द्या हे जे गेले दीड वर्ष ठाकरे सरकारने चालवले आहे. तर त्या काही द्या वाल्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अनिल परब यांनी किती माया गोळा केली आहे ते संजय राऊत यांना विचारायला सांगा. आरटीओ ट्रांसफर पासून ते रिसॉर्टमध्येही गैरव्यवहार केला आहे. अनिल परब यांनी मान्य केलंय की त्यांनी २ नंबरचे पैसे वापरले आहेत. यांना विचारा की १०० कोटीतून किती रुपये सचिन वाझेकडून मिळाले? म्हणून ते घोटाळेबाज आहेत. मी अनिल परब संबंधीत मागील ४ महिन्यांपासून बोलत आहेत. यामुळे घोटाळेबाजांना स्टंटबाजी करांना लपवता येणार नाही. घोटाळेबाजांना जाब द्यावा लागणार अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब आणि पुढचा नंबर जितेंद्र आव्हाड यांचा असेल भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : ती सीडी पोलिसांकडे, योग्य वेळी लावणार – खडसेंचा इशारा


 

First Published on: August 29, 2021 8:34 PM
Exit mobile version