सूरबहार वादक अन्नपूर्णा देवी यांच निधन

सूरबहार वादक अन्नपूर्णा देवी यांच निधन

अन्नपूर्णा देवी यांच निधन

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रख्यात सूरबहार वादक ‘अन्नपूर्णा देवी’ याचं आज वृद्धपकाळानं निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कणडी रुग्णालयात त्यांनी ९१ व्या वर्षी आज अखेरचा श्वास घेतला. अन्नपूर्णा देवी यांच्या निधनांमुळे संगीत विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अन्नपूर्णा देवी यांच्याविषयी थोडस

अन्नपूर्णा देवी यांचा मध्य प्रदेशातील मैहर येथे १९२७ मध्ये जन्म झाला होता. प्रसिद्ध संगीतकार अल्लाउद्दीन खान हे त्यांचे वडिल होते, त्यांच्याकडून अन्नापूर्णा देवींनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले होते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सितार आणि सूरबहार शिकल्या. त्यापुढे त्यांचे सूरबहार या वाद्याशी त्याचं नाव जोडलं गेल. त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर त्यांचा प्रख्यात सतारवादक पंडित रवी शंकर यांच्याशी विवाह झाला होता.

अन्नपूर्णा देवी यांना मिळाले पुरस्कार

स्वत:चा वेगळा ठसा उमटावणाऱ्या प्रख्यात गायक सूरबहार वादक अन्नपूर्णा देवी यांना १९७७ साली ‘पद्मभूषण’ पुरस्कार मिळाला होता. तर १९९१ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यांना विश्वभारती विद्यापीठाकडून १९९९ साली देसीकोट्टम पदवी बहाल करण्यात आली होती. तर २००४ साली त्यांना रत्न पुरस्कार देखील देण्यात आला.

First Published on: October 13, 2018 11:17 AM
Exit mobile version