स्वच्छतागृहाच्या दारात फळांची स्वच्छता, अमोल मिटकरींकडून आणखी एक व्हिडीओ जारी

स्वच्छतागृहाच्या दारात फळांची स्वच्छता, अमोल मिटकरींकडून आणखी एक व्हिडीओ जारी

मुंबई – स्वच्छतागृहात चहाचे कप धुतले असल्याचा व्हिडीओ बाहेर आल्यानंतर विधान भवनात चहा पिणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली होती. आता आमदार अमोल मिटकरी यांनी असाच आणखी एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानुसार, विधिमंडळ परिसरातील स्वच्छतागृहात फळे स्वच्छ केली जात असल्याचं समोर आलं आहे. याबात अमोल मिटकरी यांनी व्हिडीओ ट्वीट केला आहे.

हेही वाचा – विधानभवनात आता कागदी कपातून चहा, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर नीलम गोऱ्हेंचे निर्देश

‘नागपूर विधिमंडळ परिसरातील ज्युस सेंटरमधील धक्कादायक प्रकार. शौचालयाच्या प्रवेशद्वारावर ज्युस सेंटरची फळं स्वच्छ केली जातात. हिवाळी अधिवेशनात अनेक आमदार आणि अधिकारी या सेंटरवरुन ज्युस घेतात. शौचालयाच्या बाहेर संत्र्याची साल काढली जाते आणि इतर फळं स्वच्छ केली जातात,’ असं अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ जारी करून पोस्ट केली आहे.


‘अधिकारी, कर्मचारी आणि नेत्यांच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी मोठ्याप्रमाणात खर्च केला जातो, मग अशी हयगय का केली जाते,’ असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना याप्रकारावर टीका केली आहे.

हेही वाचा – वाढवण बंदरामुळे गुजरात बंदराचे महत्त्व संपेल, फडणवीसांनी दिली इनसाइड माहिती

कप धुतल्याचा व्हिडीओ जारी

विधान भवनात स्वच्छतागृहातील नळावर चहा पिण्याचे कपबशा धुण्यात आल्याचा प्रकार काल अमोल मिटकरी यांनी उघडकीस आणला होता. यामुळे विधिमंडळातील सदस्यांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना विधिमंडळातील सदस्यांच्या आरोग्याबाबत अशाप्रकारे हलगर्जीपणा केला जात आहे, यावरून अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत आवाज उठवला. तसंच, स्वच्छतागृहात कपबशा धुतले गेल्याचा व्हिडीओही मिटकरींनी विधान परिषदेत पेन ड्राईव्हच्या माध्यमातून सादर केला. यावरून नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. यापुढे मध्यम आकाराच्या कागदी कपातून चहा देण्याचे निर्देश मी संबंधित कंत्राटदाराला देणार आहे. तसंच, स्वच्छतागृहात कपबशा धुण्यात आल्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचेही आदेश देण्यात येतील, असं नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं.

First Published on: December 23, 2022 11:04 AM
Exit mobile version