सोसायट्यांना बजावलेल्या NA टॅक्स नोटिसींना स्थगिती द्या, आशिष शेलारांचं ठाकरे सरकारला पत्र

सोसायट्यांना बजावलेल्या NA टॅक्स नोटिसींना स्थगिती द्या, आशिष शेलारांचं ठाकरे सरकारला पत्र

भ्रष्टाचाराविरोधातील लढाई सुरू झालीय आणि यात जनताच जिंकेल, आशिष शेलारांचा मविआवर निशाणा

महाविकास आघाडी सरकारने बिगरशेती टॅक्स (NA TAX) भरण्यासंदर्भातील नोटीसा शहर परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांना आणि रहिवाशांना पाठवल्या आहेत. यामुळे नागरिकांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. फडणवीस सरकारने एनए टॅक्सवर स्थगिती आणली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारने स्थगिती उठवून रहिवाशांना नोटीसा पाठवल्या आहेत. रहिवाशांना पाठवलेल्या अन्यायकारक नोटीसांवर स्थगिती आणावी अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारला केली आहे.

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये एनए टॅक्सच्या नोटीसा रद्द करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने शहरी भागातीला रहिवाशी इमारतीमधील घरमालकांना आणि सोसायट्यांना बिगरशेती कर (एनए टॅक्स) भरण्याची नोटीस बजावली आहे. या टॅक्सबाबतचा निर्णय हा अधिक काळापासून प्रलंबित आहे. यामुळे अधिक प्रमाणातील दंड या टॅक्समध्ये आकारण्यात येत आहे. जागामालकाने किंवा बांधकाम व्यावसायिकांनी हा कर भरणे आवश्यक असते मात्र त्यांनी भरला नसल्यामुळे याचा बोझा रहिवाशांवर आला आहे.

आशिष शेलार यांनी पत्रामधून ठाकरे सरकरला विनंती केली आहे की, एनए टॅक्सच्या नोटिसींवर स्थगिती आणण्यात यावी.


हेही वाचा : PM Modi Security: पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा, पंजाब दौऱ्यातील ३ धक्कादायक खुलासे

First Published on: January 6, 2022 11:31 AM
Exit mobile version