पेंग्विन सेनेने आता ‘कबर बचाव अभियान’ सुरू करावं, आशिष शेलारांची मविआवर टीका

पेंग्विन सेनेने आता ‘कबर बचाव अभियान’ सुरू करावं, आशिष शेलारांची मविआवर टीका

अस्लम शेख ते नवाब मलिक आणि महानगरपालिकेतील उद्धव ठाकरेंची पेंग्विन सेना यांनी याकूब मेमनला फाशी देऊ नका म्हणून अर्ज केले होते. याकूब मेमनला जिवंत टिकवू शकले नाहीत. त्यामुळे याकूब मेमनचा दहशतवाद त्याच्या कबरीतून आणि थडग्यातून जोपासण्याचा हा पेंग्विन सेनेचा प्रयत्न आहे, असं म्हणत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा शेलार म्हणाले की, याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारे अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री होती. ते सांगायचे की, आदित्य ठाकरे आपले भाऊ आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम झाले आणि उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद मिळाला, तर याकूबच्या कबरीचे सौंदर्य करणं होणार ना? तुम्ही 25 वर्ष सत्तेत बसलात, महापौर तुमचा तरी ही याची खबर कशी नाही मिळाली? ही जबाबदारी तुमचीच आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

माझी खुर्ची, माझा परिवार यापलीकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व नाही. पेंग्विन सेना वानखेडे उखडून टाकायला गेले होते ना, मग आता ही कबर उखडून दाखवा . तुकडे तुकडे गॅंगच्या दबावाखाली हे केले आहे. अफजल तेरे कातील जिंदा है हम
शर्मिंदा है…असे हे तुकडे तुकडे गॅंग म्हणाले आहेत. नवाब मलिक, अस्लम शेख तूकडे-तुकडे गँगला खूश करण्यासाठी करण्यात आले आहे. याकूबला जिवंत ठेवला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनंतर याकूबवर फाशीची कारवाई झाली. तेव्हा अस्लम शेख यांनी विरोध केला होता. हे विसरून चालणार नाही, असं शेलार म्हणाले.

भाजपा आमदार राम कदम यांनी फोटो ट्वीट करत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने हे घडले की मुंबई प्रेमातून? हीच त्यांची देशभक्ती आहे का? असे सवाल त्यांनी ट्विटरद्वारे विचारला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या कबरीचे ‘मजार’मध्ये रुपांतर झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबद्दल जनतेची माफी मागावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.


हेही वाचा : याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण : भाजपाची मविआवर टीका, शिवसेना व काँग्रेसकडून पलटवार


 

First Published on: September 8, 2022 4:04 PM
Exit mobile version