नवी मुंबईतील चर्चसह आश्रम शाळेवर हातोडा, भाजपच्या इशाऱ्यानंतर पालिकेची कारवाई

नवी मुंबईतील चर्चसह आश्रम शाळेवर हातोडा, भाजपच्या इशाऱ्यानंतर पालिकेची कारवाई

नवी मुंबई –  भाजप प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ व भाजप प्रदेश आयटी सेल प्रमुख सतीश निकम यांनी २८ नोव्हेंबर २०२२ सीवुड येथील बेथेल गॉस्पेल चर्चमध्ये बळजबरीने धर्मांतरण आणि महिलांना बाबत तक्रारी दिल्या आल्याने पाहणी करुन कारवाई करण्याची मागणी केली होती. बेथेल गॉस्पेल चर्च व आश्रम शाळेवर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाची नोटीस पाठून सुद्धा कारवाई करण्यात येत नव्हती. बाबत चित्रा वाघ यांनी पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन ८ दिवसात संबंधित आश्रम वर कारवाईची मागणी केली. त्यानुसार आज २ नोव्हेंबर रोजी पालिका आणि सिडकोच्या अतिक्रमण पथकाने पोलिसांच्या बंदोबस्तात या चर्चवर हातोडा चालविला.

सीवुडस्, सेक्टर-४८ येथील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमध्ये चालविण्यात येत असलेल्या आश्रम शाळेत मुला-मुलींचा लीं छळ करण्यात येत असल्याचा प्रकार काही महिन्यांपुर्वी समोर आला होता. आश्रममध्ये ३ ते १८ वयोगटातील ४५ मुलां-मुलींची ऑगस्ट महिन्यात ठाणे बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि युवा चाईल्ड लाईनच्या प्रतिनीधींसह तपासणी करुन धक्कादायक प्रकार निषप्पन झाल्यानंतर मुलां-मुलींची सुटका केली होती.

दरम्यान, नोव्हेंबरच्या अखेरीस भाजपाच्या प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ व भाजप प्रदेश आयटी सेल प्रमुख सतीश निकम यांनी या चर्चमध्ये सुरु असणार्‍या गैरप्रकारानंतर आश्रम शाळेवर कारवाई करण्या बरोबरच कारवाई करण्यास निष्क्रीय ठरलेल्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरिश पटनिगीरे यांच्यावर विभागीय चौकशी करावी अशी मागणी पालिका आयुक्त नार्वेकरांंकडे केली होती. तर पालिकेला कारवाईसाठी आठ दिवसांची मुदत दिली होती.

पालिका आणि सिडकोच्या अतिक्रमण पथकाने चर्च व आश्रम शाळेवर कारवाई केली. चर्चमधील सर्व साहित्य बाहेर काढून टाकण्यात आले. या आश्रम शाळेत वास्तव्यास असणारे काही आश्रित दोन महिला व पुरुषांना हलविल्यानंतर यावर कारवाई करण्यात आल्याचे बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्त मिताली संचेती यांनी माहिती देताना सांगितले.


हेही वाचा : महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कर्नाटकात पाठवू नका, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं


 

First Published on: December 2, 2022 8:09 PM
Exit mobile version