नक्की वाचा! ‘या’ तारखा आहेत महत्त्वाच्या; महाराष्ट्र, हरियाणात आचारसंहिता लागू

नक्की वाचा! ‘या’ तारखा आहेत महत्त्वाच्या; महाराष्ट्र, हरियाणात आचारसंहिता लागू

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१९

दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद नुकतीच संपली असून यामध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून आज अखेर विधानसभेचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकारांना विधानसभा निवडणुकीची माहिती दिली आहे.

 


हेही वाचा –  साताऱ्यातील पोटनिवडणूक लांबणीवर


महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१९

आचारसंहिता

आजपासून म्हणजेच २१ सप्टेंबर पासून आचारसहिंता लागू करण्यात आली आहे. तसेच ही निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत ही आचारसहिंता लागू करण्यात आली आहे.

अर्ज भरणे

२८ सप्टेंबर ते ०४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत अर्ज भरण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

अर्ज छानणी

०५ ऑक्टोबरला अर्ज छानणी केली जाणार आहे.

अर्ज मागे घेणे

तसेच एखाद्याला अर्ज मागे घ्यायचा असल्यास तो ०७ ऑक्टोबरपर्यंत घेता येणार आहे.

विधानसभा निवडणुका

२१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका जाहिर करण्यात आली आहे.

मतमोजणी

विधानसभा निवडणुका २१ ऑक्टोबरला पार पडणार असून याचा निकाल २४ ऑक्टोबर जाहिर करण्यात येणार आहे.


हेही वाचा – Assembly Elections 2019 : राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान; २४ ला निकाल


First Published on: September 21, 2019 2:00 PM
Exit mobile version