भिंतीला भगदाड पाडून युको बँक लुटण्याचा प्रयत्न

भिंतीला भगदाड पाडून युको बँक लुटण्याचा प्रयत्न

रविवार कारंजा येथील यशवंत मंडई भागातील नॅशनल युको बँकेच्या पाठीमागील भिंतीला चोरट्यांनी भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश करत लूट करण्याचा प्रयत्न केल्याची सोमवारी (दि.१०) उघडकीस आले. चोरट्यांच्या हाती रोकड लागली नसून चोरट्यांनी सीसीटीव्हीचे नुकसान बँकेतील २ संगणक व एक लॅपटॉप लंपास केला आहे.

शनिवार व रविवार सुट्टीची संधी साधत चोरट्यांनी युको बँकेत प्रवेश केला. सोमवारी सकाळी युको बँकेचे शटर कर्मचार्‍यांनी उघडले असता बँकेतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून दिसले. पाठीमागील भिंतीला भगदाडदेखील आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी धागेदोरे शोधले जात आहे. चोरट्यांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे नुकसान केल्याचे आढळले.

First Published on: August 10, 2020 1:53 PM
Exit mobile version