Aurangabad water problem : कारणे सांगू नका, तातडीने मार्ग काढा, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

Aurangabad water problem : कारणे सांगू नका, तातडीने मार्ग काढा, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

औरंगाबादमध्ये पाण्याच्या प्रश्नावरुन जनता त्रस्त आहे. अनेक मैल पाण्यासाठी चालत जावं लागत. तसेच टँकरच्या पाणी पुरवठ्यामध्ये कुटुंबाची तहान भागत नाही. औरंगाबादकरांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दात निर्देश दिले आहेत. मला कारणे सांकू नका तर तातडीने मार्ग काढा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये औरंगाबादमधील नागरिकांना पाणी व्यवस्थित मिळाले पाहिजे. नवीन योजना पूर्ण होईस्तोवर कालावधी लागेल.त्यामुळे सध्या किती आणि कसे पाणी वाढवून देता येईल याकडे लक्ष द्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद पाणी प्रश्नावरुन आढावा बैठक घेतली होती. या बैठीमध्ये अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी चांगलेच फैलावर घेतलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे याकरिता सध्याच्या पाणी वितरणात आणखी जादा पाणी कसे उपलब्ध होईल यासाठी विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रितीने पाणी मिळेल हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पाणी योजनेच्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. दरम्यान, औरंगाबाद शहराच्या १६८० कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करण्यासाठी या योजनेचा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून नियमितपणे आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

पाणीपुरवठा योजनेचे काम निधी अभावी रेंगाळणार नाही

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणे हे प्राधान्याचे काम असून शहर पाणीपुरवठा योजनेचे काम निधी अभावी रेंगाळणार नाही, याची दक्षता शासनाने घेतली आहे. शहराच्या पारोळ्यापर्यंत पाणी आणणे, ते साठविण्यासाठी टाक्या बांधणे ही कामे तातडीने करावी लागणार असून या योजनेचा काही भाग हा जायकवाडी प्रकल्पात असल्याने त्यासाठी केंद्रीय वन विभागाची परवानगी आवश्यक आहे, ही परवानगी मिळविण्यासाठी वन विभागाने तातडीने केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास कठोर कारवाई

शहरात पाणीपुरवठ्याची नवीन योजना पूर्ण होईपर्यंत कालावधी लागणार असून कोणत्याही परिस्थितीत शहरात पाण्याअभावी परिस्थिती बिकट होणार नाही यासाठी गतीने कार्यवाही करून विभागीय आयुक्तांनी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. शहर पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम कंत्राटदार संथ गतीने करीत असल्याच्या तक्रारी आहेत ही अतिशय गंभीर बाब असून त्यांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास विविध कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. वेळेत काम पूर्ण करुन घेण्यासाठी संबंधित कंत्राटदारांकडून हमीपत्र लिहून घेण्याबरोबरच कालबद्धरित्या काम पूर्ण होण्यासाठी वेळापत्रक तयार करा आणि मुख्यमंत्री संकल्प कक्षातून योजनेच्या कामाचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.


हेही वाचा : राज्यात आता दारूची होम डिलिव्हरी करणे बंद, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

First Published on: June 2, 2022 4:55 PM
Exit mobile version