भाजपचा भाग नसल्यामुळे जागा ठेवणं अयोग्य, बाबुल सुप्रियोंनी दिला खासदारकीचा राजीनामा

भाजपचा भाग नसल्यामुळे जागा ठेवणं अयोग्य, बाबुल सुप्रियोंनी दिला खासदारकीचा राजीनामा

भाजपचा भाग नसल्यामुळे जागा ठेवणं अयोग्य, बाबुल सुप्रियोंनी दिला खासदारकीचा राजीनामा

भाजपला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता खासदार बाबुल सुप्रियो यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून खासदारकीचा राजीनामा दिला आहे. भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संधी दिल्यामुळे त्यांचे आभारी असल्याचे सुप्रियो म्हणाले. तसेच भाजप सोडताना वाईट वाटले असे बाबुल सुप्रियो यांनी सांगितले आहे. पक्षाचा भाग नसल्यामुळे ही जागा ठेवणे योग्य नसल्याचे बाबुल सुप्रियो यांनी म्हटलं आहे.

तृणमूल काँग्रेस नेते बाबुल सुप्रियो यांनी भाजपमधून टीएमसीत सप्टेंबर २०२१ मध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात संधी न दिल्यामुळे सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता भाजपचा भाग नसल्यामुळे जागा ठेवणं योग्य नाही. यामुळे सुप्रियो यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची सुप्रियो यांनी भेट घेतली. राजीनामा दिल्यानंतर सुप्रियो माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, माझ्या राजकीय करिअरला भाजपमध्ये सुरुवात केली. त्यामुळे भावूक झालो असे सुप्रियो यांनी म्हटलं आहे.

भाजपमध्ये संधी दिली आणि विश्वास दाखवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे बाबुल सुप्रियो यांनी आभार मानले आहेत. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आपण राजकारणातून संन्यास घेणार असल्याचे सुप्रियो यांनी सांगितले आहे. १८ सप्टेंबर २०२१ रोजी सुप्रियो यांनी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी ऑफर दिल्यामुळे टीएमसीमध्ये प्रवेश केला असल्याचे सुप्रियो यांनी सांगितलं होते. तसेच राजकारणातील नव्या करिअरला सुरुवात करत असल्याची घोषणा केली होती परंतु आता सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याचे जाहीर केलं आहे.


हेही वाचा : UP Assembly Election: युपी विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकिटं महिलांना देणार, प्रियंका गांधींचा मोठा निर्णय

First Published on: October 19, 2021 4:10 PM
Exit mobile version