Movie Review : ‘ठाकरे’ चित्रपटात गद्दारांना स्थान नाही

Movie Review : ‘ठाकरे’ चित्रपटात गद्दारांना स्थान नाही

ठाकरे चित्रपटात छगन भुजबळ, नारायण राणे यांना स्थान नाही

बहुप्रतिक्षित असलेला ठाकरे सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला असून, मोठ्या संख्यने शिवसैनिकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहाच्या बाहेर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. “बाळासाहेबांच्या रिअल लाईफमध्ये जसे गद्दारांना स्थान नव्हतं, त्याचप्रकारे ठाकरेंच्या रील लाईफमध्ये देखील गद्दारांना वगळण्यात आले आहे.” शिवसेना सोडून गेलेले छगन भूजबळ, नारायण राणे आणि गणेश नाईक यांना संपूर्ण चित्रपटात कुठेही स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे बाळासाहेबांना जे लोक सोडून गेले, त्यांचे नाव बाळासाहेबांनी पुन्हा कधीही घेतले नव्हते. हीच काळजी चित्रपट निर्माते संजय राऊत यांनी घेतलेली दिसून येते.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे एकेकाळचे बाळासाहेबांचे कट्टर कार्यकर्ते समजले जात होते. मात्र या दोघांनीही शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना आपल्या जीवनात कधीच स्थान दिले नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या रिअल लाईफ प्रमाणे रिल लाईफमध्ये देखील गद्दारांना स्थान दिलेले नाही. १९९० च्या दशकात छगन भुजबळ, गणेश नाईक आणि त्यानंतर नारायण राणे यांचा शिवसेनेत एकच दबदबा होता. नारायण राणे, भुजबळ आणि गणेश नाईक तर बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू नेत्यांपैकी एक होते. या त्रिकुटाचा शिवसेनेमध्ये तेव्हा चांगलाच दबदबा होता.

या सिनेमाचे निर्माते संजय राऊत यांचा देखील त्याकाळात शिवसेनेत उदय होत होता. मात्र या तिघांमुळे संजय राऊत यांना त्रास झाल्याने या तिघांनाही सिनेमात कुठेही स्थान न देण्याचे निर्माते संजय राऊत यांनी कटाक्षाने टाळल्याचे दिसून येत आहे.

सिनेमात कट्टर शिवसैनिकांना स्थान

एकीकडे शिवसेना सोडून शिवसेनेशी गद्दारी केलेल्यांना जरी सिनेमात स्थान देण्यात आले नसले तरी मात्र जे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले स्वर्गीय आनंद दिघे, वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी आणि मनोहर जोशींना मात्र या सिनेमात चांगले स्थान देण्यात आले आगे. अनेक प्रसंगात ही मंडळी बाळासाहेब ठाकरे यांच्या अवतीभवती असल्याचे दाखवण्यात आले आहे.

सिनेमातही पंतावर जीव

बाळासाहेब ठाकरे यांचा पंत म्हणजेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर जीव होता. बाळासाहेबांच्या सोबत नेहमीच मनोहर जोशी असायचे. ठाकरे सिनेमात देखील बाळासाहेबांसोबत मनोहर जोशी यांना दाखवण्यात आले आहे. बाळासाहेब आणि पंत यांचे नाते कसे होते? हे देखील दाखवण्यात आले आहे. संदीप खरे या सिनेमात मनोहर जोशी यांच्या भूमिकेत दाखवला असून, मनोहर जोशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील कसे बाळासाहेब आणि ठाकरे कुटुंब त्यांच्यासोबत होते, हे देखील या सिनेमात दाखवण्यात आले. विशेष म्हणजे ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना तुरुंगवास झाला त्यावेळी पंत कसे बाळासाहेबांसोबत तुरुंगात होते, हे देखील या सिनेमात दाखवण्यात आले आहे.

First Published on: January 25, 2019 1:24 PM
Exit mobile version