घरमहाराष्ट्रनारायण राणेंना पुन्हा आठवली किक! म्हणाले....

नारायण राणेंना पुन्हा आठवली किक! म्हणाले….

Subscribe

'शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही त्यांना किक मारूनच बाहेर काढावे लागेल', असा टोला नारायण राणे यांनी यावेळी सेनेला लगावला.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युती झाली तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे काय होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, आता खुद्द नारायण राणे यांनी ‘युती होवो न होवो मी स्वतंत्र लढणार’ असे एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. तसेच ‘नारायण राणे यांचे भाजपामध्ये मन रमत नाही’ असे वक्तव्य माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्याला उत्तर देताना ‘माझ्याबद्दल थोरतांनाच जास्त माहीत असावे’, असा टोला लगावत राणेंनी त्यांच्या काँग्रेसमध्ये घरवापसीच्या चर्चना पूर्ण विराम दिला. तसेच नारायण राणे यांना सगळ्याच पक्षाकडून मागणी आहे, त्यामुळे तिन्ही राणे लवकरच एकाच पक्षात
दिसतील असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, राणेंनी त्यांच्या संपूर्ण मुलाखतीत फक्त शिवसेनेवरच टीका केल्याचे पहायला मिळाले. ‘शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही त्यांना किक मारूनच बाहेर काढावे लागेल’, असा टोलादेखील नारायण राणे यांनी लगावला.

युती झाली तरी सेनेला फटका बसणार

राणे म्हणाले की, ‘भाजपा -शिवसेना युती झाली तरी शिवसेनेचे खासदार निवडणून येणार नाहीत. कारण त्यांच्या खासदार, आमदार आणि मंत्र्यांनी एकही काम पाच वर्षात केलेलं नाही. तसेच युती झाली तरी भाजपाचे कार्यकर्ते शिवसेनेला मत देणार नाहीत.’ दरम्यान, निलेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल राणेंना विचारले असता राणे म्हणाले, की ‘माझ्या मुलाने ज्या भाषेत उत्तर दिले ते चुकीचे नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी माझ्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे माझ्या मुलाला राग येणे साहजिकच आहे.’

- Advertisement -

भाजपाला २०० जागा मिळणार

दरम्यान आगामी लोकसभेत मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का? याबद्दल राणेंना विचारले असता, ‘२०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपाला २०० जागा मिळतील’, असे उत्तर त्यांनी दिले. तसेच ‘भाजपाने जी जाहीरनामा समिती जाहीर केली त्याची मला काही कल्पना नव्हती. मला न विचारताच त्यांनी मला हा मान दिला आणि माझे नाव जाहीरनामा समितीत घेतले’, असेही राणेंनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -