राज्याचं हित आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं यावरुन पुढील निर्णय घ्यावे – बाळासाहेब थोरात

राज्याचं हित आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं यावरुन पुढील निर्णय घ्यावे – बाळासाहेब थोरात

राज्यात सध्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचं सरकार आहे. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेले काही दिवस सातत्याने स्वबळाचा नारा देत आहेत. यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचे सुतोवाच दिले. यावर महसूल मंत्री बाळासाहेब ओथरात यांनी प्रतिक्रिया दिली. राज्याचं हित आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं यावरुन पुढील निर्णय घ्यावेत, अशी भूमिका थोरात यांनी मांडली. थोरात यांच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची भूमिका थोरात यांना रुचलेली दिसत नाही आहे.

स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. विधानसभा निवडणुकीला अजून साडे तीन वर्ष अवकाश आहे. त्यामुळे त्या विषयावर चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही राज्यात मंत्र्यांनी फिरलं पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. येणाऱ्या काळात ज्या निवडणुका येणार आहेत. यासाठी पक्ष म्हणून जे काम करायचं आहे, त्यावर लक्ष द्यावं, असं थोरात म्हणाले. जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यावर देखील थोरात यांनी प्रतिक्रिया दिली.

दोन उद्दिष्टांवर महाविकास आघाडी स्थापन झाली आहे. महाराष्ट्रात विकास घडवून आणणं आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं या दोन गोष्टींवर आम्ही काम करत आहोत. मला असं वाटतं की या दोन गोष्टी केंद्रस्थानी ठेवून आम्हाला पुढील निर्णय घ्यावे लागतील, असं थोरात म्हणाले. प्रत्येक पक्षाला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्हाला देखील अधिकार आहे की, आमचा पक्ष वाढवावा, बळकट झाला पाहिजे, संख्याबळ वाढला पाहिजे. त्यासाठी आमचं काम सुरु आहे, असं थोरात यांनी सांगितलं.

 

First Published on: June 18, 2021 12:35 PM
Exit mobile version