महाराष्ट्रात आजपासून पुन्हा सलून सुरु; ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

महाराष्ट्रात आजपासून पुन्हा सलून सुरु; ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

सलून

महाराष्ट्रात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा ३० जूनपर्यंत ठेवण्यात आला असून अनलॉक १ देखील सुरु आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गेले ३ महिन्यांपासून बंद असलेले केशकर्तनालये आणि सलून (Barber Shops & Salons) आजपासून सुरु झाले आहेत. दरम्यान सलून मालकांच्या मागण्यांचा विचार करत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात फक्त केशकर्तनालय सुरु करण्यास मान्यता दिली आहे. इतर सलून, ब्युटी पार्लर, स्पा आदी सुरु करण्याची परवानगी नाही, असे देखील सांगितले जात आहे. केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी यासाठी विशेष नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. या नियमांचे पालन करून केशकर्तनालये आणि सलूनचे शॉप्स सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे.

फक्त केस कापायला परवानगी!

राज्यात २० मार्च रोजी लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर सर्वच सलून बंद ठेवण्यात आले होते. सलून व्यावसायिकांनीही गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक स्थिती खालावली असून, व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नाभिक संघटनांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

यावेळी सलूनमध्ये फक्त केस कापायला परवानगी देण्यात आली असून दाढी आणि इतर सेवांसाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. याशिवाय, केस कापणारा आणि ग्राहक अशा दोघांनाही मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

‘या’ नियमांचे करावे लागणार पालन


राज्यात २८ जूनपासून सलून सुरू; फक्त केस कापायला परवानगी!
First Published on: June 28, 2020 1:07 PM
Exit mobile version