कोकणात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘हे’ तीन नेते शिंदे गटात सामील

कोकणात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘हे’ तीन नेते शिंदे गटात सामील

एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता संपूर्ण पक्षावर शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. यात बंडखोरी करत शिंदे गटात सामील झालेले सिंधुदुर्गातील आमदार दीपक केसरकर यांनी आज उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन उपतालुका प्रमुखांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन उपजिल्हा प्रमुखांनी आज भेट घेत युती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचे काम बाळासाहेबांची शिवसेना करत असल्याने पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

सचिन देसाई, सुनील डुबळे आणि बाळा दळवी अशी शिंदे गटात सामील झालेल्या नेत्यांची नावं आहेत. दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार प्रतापराव जाधव आणि खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.


Meta ला रशियाने दहशतवादी संघटना म्हणून केले घोषित; पण कारण काय?

First Published on: October 11, 2022 9:54 PM
Exit mobile version