हेल्मेट घातले असते, तर तो वाचला असता

हेल्मेट घातले असते, तर तो वाचला असता

कंटेनरच्या धडकेत पुण्यातील तरुणाचा मृत्यू

बहिणीला रेल्वे स्टेशन येथे घेण्यासाठी निघालेल्या भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तळेगाव येथे गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. प्रतीक विजय ढोरे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो आपल्या बहिणीला घेण्यासाठी दुचाकीवरुन निघाला होता. त्या दरम्यान, त्यांना समोरुन येणाऱ्या भरधाव कंटेनरने धडक दिली. या धडकेमध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे. हा अपघात चाकण तळेगाव रोडवर झाला असून प्रतीक हा विना हेल्मेट दुचाकी चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कदाचित त्यांने हेल्मेट घातले असते तर तो वाचला असता.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक विजय ढोरे (१८) हे कामावरून आलेल्या बहिणीला आणण्यासाठी तळेगाव रेल्वे स्थानकाच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. त्याच दरम्यान समोरुन येणाऱ्या कंटेनर आणि दुचाकीची यांच्यात धडक झाली. या अपघातामध्ये प्रतीक रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्याला तात्काळ नागरिकांनी रुग्णालयात नेले. परंतु, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे ढोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रतीकने दुचाकी चालवत असताना हेल्मेट घातले नव्हते, अशी माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे. तो १२ वीत शिक्षण घेत होता अशी माहिती समोर येत आहे. अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक हा फरार झाला असून त्याचा शोध तळेगाव पोलीस घेत आहेत.


हेही वाचा – मालेगावनजीक अपघातात चौघे जागीच ठार

हेही वाचा – देवी भक्तांवर काळाचा घाला; टेम्पो अपघातात नाशिकचे ७ भाविक ठार


 

First Published on: March 1, 2019 3:03 PM
Exit mobile version