घरमुंबईरासायनिक अपघात रोखण्यासाठी अग्निशमन दल सज्ज

रासायनिक अपघात रोखण्यासाठी अग्निशमन दल सज्ज

Subscribe

ताफ्यात हॅजमेंट वाहन दाखल

मुंबईत वायू गळती किंवा त्यापासून लागणार्‍या आगीच्या दुघर्टना तसेच त्यापासून होणार्‍या अपघातांवर मात करण्यासाठी अग्निशमन दलाच्यावतीने हॅजमेंट वाहन ताफ्यात दाखल झाले आहे. त्यामुळे याचे प्रशिक्षण सध्या जवानांना देण्यात येत असून ३० अधिकारी व जवानांनी याचे प्रशिक्षण घेतले आहे. मुंबई अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्यात येत आहे. मुंबई आगीच्या दुघर्टनांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे, परंतु यांपैकी बहुतांशी आगी या शॉटसर्कीटमुळे लागत असून टोलेजंग इमारत तसेच ग्लास फसाड इमारतींमुळे आग विझवताना जवानांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. त्यामुळे अग्निशमन दलाला अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून दिल्या जात असतानाच आता त्यात रासायनिक वायूमुळे निर्माण होणार्‍या दुघर्टनांवर मात करण्यासाठीच्या हॅजमेंट वाहनाचा समावेश आहे.

बर्‍याचवेळी रासायनिक वायुची गळती किंवा त्यापासून लागणारी आग आदी वायूंपासून निर्माण होणार्‍या आपत्कालीन समस्यांवर मात करण्यासाठी या हॅजमेंट संयंत्राची खरेदी करण्यात आली आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी स्थायी समितीने या वाहनाच्या खरेदीला मान्यता दिल्यानंतर हे वाहन आता दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. सध्या यासाठीच्या एका वाहनाची खरेदी करण्यात येत आहे.

- Advertisement -

हे संयंत्र युरोपच्या स्लोविनिया येथून खरेदी करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या दोन अधिकार्‍यांनी हे वाहन तसेच त्यातील उपकरण हाताळण्याचे युरोपमध्ये जावून प्रशिक्षण घेतले आहे. या अधिकार्‍यांच्या मदतीने ८ अधिकारी व  चालकांसह २२ जवान  आदी ३० जणांना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी स्पष्ट केले. लवकरच या वाहनांचा वापर केला जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -