Bird Flu: २४ तासांत २१४ कावळे व कबुतरांचा मृत्यू

Bird Flu: २४ तासांत २१४ कावळे व कबुतरांचा मृत्यू

bird flu: मुंबईत २४ तासात ११४ कावळ्यांचा मृत्यू

राज्यात काही जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ने कोंबड्या, कावळे यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणें , मुंबईतही आता कावळे, कबुतरे यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या २४ तासात मुंबईत २१४ कावळे, कबुतरे यांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या १० दिवसांत तब्बल १ हजार २९६ कावळे, कबुतरे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. वास्तविक, मुंबईत गेल्या ५ जानेवारीपासून कावळे, कबुतरे मृत पावल्याच्या घटनासत्राला सुरुवात झाली आहे. गिरगाव, चेंबूर या भागात अगोदर जास्त प्रमाणात कावळे, कबुतरे मृत पावल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

बर्ड फ्लूने मालाड, दादर, सायन, माटुंगा, बोरिवली, कांदिवली, अंधेरी, प्रभादेवी, वडाळा,माटुंगा, सायन, मानखुर्द, गोवंडी, चंदनवाडी आदी परिसरात कावळे कबुतरे मृत पावल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. मुंबईत बर्ड फ्लूचा धोका वाढत असल्याने पालिकेने नागरिकांना भयभित न होता पालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील १९१६ या हेल्पलाईनवर मृत पक्षांबाबत तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. यानुसार पालिकेकडे आता मृत कावळे व कबुतरे यांच्याबाबत तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे.

या तक्रारी प्राप्त झाल्यावर पालिकेच्या घनकचरा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन मृत कावळे, कबुतरे ताब्यात घेतात व पुढे त्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

First Published on: January 17, 2021 8:23 PM
Exit mobile version