राज्यसभा निवडणुकीत भाजपची महाविकास आघाडीला धोबीपछाड

राज्यसभा निवडणुकीत भाजपची महाविकास आघाडीला धोबीपछाड

मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत.

शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 32, तर भापजचे उमेदवार धनंजय महाडिक यांना 25 मतं मिळाली.

त्यानंतर संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात आता चुरशीची लढत निर्माण झाली होती. पण, दुसऱ्या पसंतीची मतं महाडिक यांना जास्त मिळाल्यानं त्यांचा विजय झाला आहे.

दुसऱ्या पसंतीच्या मतांच गणित भाजपने जमवलं

दुसऱ्या पसंतीच्या मतांची किंमत पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराला मिळालेल्या अधिकच्या मतांवरून ठरत असते. राज्यसभा निवडणुकीत मतांचा कोटा जो उमेदवार सर्वात आधी पूर्ण करेल. जो या निवडणुकीत ४०२७ अर्थात ४०.२७ मते हा होता, तो उमेदवार विजयी होत असतो. जर पहिल्या पसंती क्रमांकात कोटा पूर्ण नाही झाला तर दुसऱ्या पसंती क्रमांकाची मते मोजणीसाठी घेतली जातात. त्यातही दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या मतांची किंमत किती हे गणित फार महत्वाच असत. भाजपाच्या रणनीतीकारांनी हे गणित ‘परफेक्ट’ बसवलं त्यामुळे त्यांना हा विजय खेचून

First Published on: June 11, 2022 7:07 AM
Exit mobile version