रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरण: तरुणीला इंजेक्शन देत गोव्यात नेलं; चित्रा वाघ यांचा धक्कादायक दावा

रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरण: तरुणीला इंजेक्शन देत गोव्यात नेलं; चित्रा वाघ यांचा धक्कादायक दावा

रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरण: तरुणीला इंजेक्शन देत गोव्यात नेलं; चित्रा वाघ यांचा धक्कादायक दावा

पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक 24 वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याच्या आरोपांमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहे. संबंधित बलात्काराचा आरोप करणारी तरूणी गेल्या दोन दिवसांपासून गायब असल्याचे आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र अखेर दोन दिवसांपासून शोध घेतल्यानंतर संबंधित तरूणी गोव्यातील एका गावात सापडली आहे. तिला इंजेक्शन देऊन जबरदस्तीने पळवून नेण्यात आले होते. ज्यात पोलिसांचाही समावेश होता असा धक्कादायक दावा आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची सविस्तर माहिती पुणे पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले. ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणासंदर्भात  धक्कादायक दावा केला आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

राज्यातील जनतेला मला सांगयचं आहे की, आपल्या सर्वांना कल्पना आहे, शिवसेनेचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचिकने बलात्कार केलेली मुलगी गेल्या दोन दिवसांपासून गायब होती. मात्र काल रात्री 11.30 वाजता मला तिचा फोन आला होता. ती म्हणाली की, मी कुठे आहे मला माहित नाही. पण मला मदतीची गरज आहे. रात्रीची वेळ होती. मी तिला म्हटलं आजूबाजूला घरे असतील तर त्यांचा दरवाजा ठोठाव आणि त्यांच्याकडे माझा कॉल दे. म्हणजे तू कुठे आहेस ते ठिकाण मला ते सांगू शकतील, त्या पद्धतीने तिने ते केलं. एका गृहस्थाने फोन घेतला आणि त्यांनी संबंधित पीडिता गोव्यातील मडगावच्या कोलवा गावात असल्याचे सांगितले. यानंतर त्या गृहस्थांनी मी संबंधित पीडित मुलाला गोवा पोलिसांपर्यंत पोहचवण्याची विनंती केली. यावेळी पीडितेशी बोलल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती मला मिळाली, असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.

संबंधित पीडित मुलगी पुण्याच्या दिशेने निघाली असता काही लोकांनी तिला वाटेत अडवले. यात काही पोलिसवाले होते. यानंतर तिला इंजेक्शन देण्यात आले तसेच कोणत्यातरी पेपर्सवर तिच्याकडून सह्या घेण्यात आल्या. यानंतर पुढे तिच्यासोबत काय झाले तिला समजलं नाही. मात्र त्यानंतर ती गोव्यातील एका गावात आढळून आली, अशी माहिती पीडितेने दिल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

चित्रा वाघ यावर पुढे म्हणाल्या की, पीडितेचा फोन झाल्यानंतर मी ताबडतोब पोलिसांना फोन करून माहिती दिली, पोलीस आता तातडीने गोव्याच्या दिशेने निघाले आहेत. पीडितेचे आई-वडील देखील तिथे पोहचले आहेत. जबाबदार लोकांनी बेजबाबदारपणे बोलू नये. तिचे आई-वडील घरी होते. मुलगी बेपत्ता होती. असंही त्या म्हणाल्या.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्यांनी 24 वर्षीय तरूणीसोबत शारिरीक संबंध ठेवले. इतकेच नाही तर तरुणी गरोदर झाल्यानंतर तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप रघुनाथ कुचिक यांच्यावर करण्यात आला आहे.

यानंतर पीडित तरूणीने रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत पीडितेने तिच्यासोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार सांगितला आहे. नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2022 या काळात तिच्यासोबत हा सर्व प्रकार घडल्याचे तिने म्हटले आहे. या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आयपीसी 376, 313, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पीडित तरूणीला जीवे मारण्याची धमकी

पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, यानंतर ती गरोदर झाल्याचे समजताच तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली तसेच जबरदस्तीने तिचा गर्भपात करून घेण्यात आल्याचा आरोपी पीडितेने केला आहे. मात्र या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकचं खळबळ उडाली आहे.


 

 

 

First Published on: March 16, 2022 4:00 PM
Exit mobile version