Sai Resort Case : किरीट सोमय्यांनी अनिल परबांविरोधातील याचिका घेतली मागे

Sai Resort Case : किरीट सोमय्यांनी अनिल परबांविरोधातील याचिका घेतली मागे

अनिल परब यांच्या अडचणीत भर, किरीट सोमैय्या रिसॉर्टविरोधात दाखल करणार तक्रार

मुंबई : दापोली मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणात दाखल केलेली याचिका भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मागे घेतली आहे. दापोली मुरुड येथे समुद्र किनारपट्टी नियमन क्षेत्र (CRZ) नियमांचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधल्याप्रकरणी सोमय्या यांनी माजी मंत्री अनिल परब आणि त्यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्याविरोधात राष्ट्रीय हरित लवादात (NGT) दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. या प्रकरणाचा दावा मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे सोमय्या यांनी ही याचिका मागे घेतली आहे.

सोमय्या यांच्या तक्रारीचा निकाल लागला नाही तर हरित लवादामध्ये पुन्हा याचिका दाखल करण्याची मुभा त्यांना न्यायिक सदस्य न्यायाधीश दिनेश कुमार सिंह आणि तज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दिलेली आहे. अनिल परब आणि सदानंद कदम यांनी मुरुड येथे समुद्र किनारपट्टी नियमन क्षेत्र अधिनियमांचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधलेले आहे. नियमाचे उल्लंघन केल्याने हे रिसॉर्ट पाडण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सोमय्या यांनी अ‌ॅड. ओंकार वांगीकर यांच्यामार्फत हरित लवादामध्ये दाखल केली होती.

केंद्रीय पर्यावरण वने व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्या राष्ट्रीय तटीय क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने रिसॉर्ट अवैध असून ते पाडण्याचे आदेश २०२२ मध्ये दिला होता. तसेच अवैध बांधकाम केल्याप्रकरणी २७ लाख २७ हजार ५०० रुपयांचा दंडाचा दावा दाखल केलेला असताना केंद्रीय पर्यावरण वने व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्या राष्ट्रीय तटीय क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने रिसॉर्ट अवैध असून ते पाडण्याचे आदेश २०२२ मध्ये दिला होता. तसेच अवैध बांधकाम केल्याप्रकरणी २५ लाख २७ हजार ५०० रुपयांचा दंड देखील करण्यात आला आहे. या आदेशाच्या विरुद्ध सदानंद कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तेथे हे प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे सोमय्या यांनी हरित लवादामधील याचिका मागे घेतली असल्याचे समजते.

First Published on: May 28, 2023 5:37 PM
Exit mobile version