‘तुम्हाला पूर्ण नडून आणि भिडून उरणार’

‘तुम्हाला पूर्ण नडून आणि भिडून उरणार’

पेगॅससची चिंता सोडा, पेंग्विनची चिंता करा, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर निशाणा

‘पूजा आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड याच्याविरोधात आवाज उठवल्यामुळे माझ्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पण, मला काहीही फरक पडत नाही. तुम्ही कितीही काही केले तरी पूजाला न्याय मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही. राजीनामा झाला म्हणजे लढाई जिंकली नाबी. शेवटपर्यंत लढत राहणार. तुम्ही मला कितीही मानसिक त्रास दिलात तरी मी शांत राहणार नाही. मी तुम्हाला पूर्ण नडून आणि भिडून उरणार’, असा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर केला आहे.

तुम्ही कितीही चौकशी करा आम्ही घाबरत नाही

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांच्या अडचणीत आता पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबै बँकचा सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. दरम्यान, नाबार्डच्या २०१८-१९च्या अहवालामध्ये बँकेच्या कामकाजावरती ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की ‘तुम्ही कितीही चौकशी करा आम्ही घाबरत नाही’, असे स्पष्टीकरण चित्रा वाघ यांने दिले आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत

संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. मात्र, धनंजय मुंडेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. याबाबतची विचारणा केली असता धनंजय मुंडे यांच्याबाबत पंकजा मुंडे बोलतील, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.


हेही वाचा – सरकारच्या मानसिकतेवरच हल्ला, इंधन दरवाढीवरून दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल


 

First Published on: March 2, 2021 11:24 AM
Exit mobile version