कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय – फडणवीस

कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय – फडणवीस

Goa Election Devendra fadnavis slams congress tmc in goa tour

कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घमसान झालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार आणि अनिल परब यांच्यात खडाजंगी झाली. या वादानंतर विरोधी पक्ष बैठकीतून बाहेर निघाला. संजय राठोड यांच्या शक्ती प्रदर्शनावेळी कोरोना दिसत नाही, अधिवेशनाच्यावेळी कोरोना दिसतो का? असा सवाल भाजपने केला. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या सरकारला अधिवेशन करायचंच नव्हतं. सरकारला कामकाज करायचंच नाही, आम्ही प्रश्न मांडायचे कुठे? असा सवाल फडणवीस यांनी केला. सगळ्या मंत्र्यांचे कार्यक्रम चालू आहेत आणि अधिवेशनाला मात्र कोरोना कोरोना म्हणतायत. कोरोनाच्या नावावर अधिवेशनापासून पळ काढला जात आहे, असा आरोप फडणवीस यांनी दिला. सरकारकडे जनतेच्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत. इथं कोरोना म्हणता, आणि मंत्र्यांसोबत दहा हजार लोकं जमा होतात. सरकारकडून अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न होतोय, असं फडणवीस म्हणाले.

विरोधक वीजबिल वाढ, संजय राठोड प्रकरणावर आक्रमक होणार हे सरकारला माहीत होते. त्यामुळे सरकारने अधिवेशनातून पळ काढला. कोरोनाच्या नावाखाली अधिवेशनाचा काळ कमी करायचा आहे. जनतेच्या प्रश्नांचं या सरकारला काहीही देणेघेणं नाही. अधिवेशनात जो कालावधी मिळतो त्या कालावधीत आम्ही आमचे आयुधं वापरुन सरकारला जनतेच्या प्रश्नांवर उत्तरं द्यायला भाग पाडू. सरकार आपलेच मंत्री आणि आमदारांना घाबरलं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीचा विषय या अधिवेशनात अजेंड्यावरच नाही, असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च पर्यंत होणार


 

First Published on: February 25, 2021 6:06 PM
Exit mobile version