घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला – नारायण राणे

घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला – नारायण राणे

सचिन वाझेला मुख्यमंत्र्यांचा पाठींबा होता; नारायण राणेंचा आरोप

भाजपचे नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहील्यांदा पाहिला, असा टोला नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. जे सरकार जनतेचं संरक्षण करू शकत नाही, त्या सरकारला बदलल्याशिवाय कोरोनावर नियंत्रण मिळवता येणार नाही, असं नारायण राणे यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून मृत्यूचा आकडाही वाढला आहे. हे सरकार जर मृत्यू थांबवण्यात अपयशी ठरत असेल तर हे सरकार काय कामाचं? रोज नवीन आदेश निघतात, पण त्या आदेशांचं पालन होत नाही. जे सरकार जनतेचं संरक्षण करू शकत नाही ते सरकार बदलल्याशिवाय कोरोनावर नियंत्रण मिळवता येणार नाही असं ठाम मत असल्याचं नारायण राणे म्हणाले. कारण हे बेजबाबदार सरकार आहे. घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहील्यांदा पाहिला, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवरही हल्लाबोल केला आहे. राज्यातील या सरकारला आधी घरी पाठवून नंतर राष्ट्रपती राजवट लागू केली पाहीजे, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.


हेही वाचा – ‘आम्ही चीनला धूळ चारू’, माजी सैनिक पुन्हा सीमेवर जाण्यास तयार


राज्यातील हे सरकार पाच वर्ष नाही तर एक वर्षही राहणं कठीण आहे. हे सरकार एकजीव नाही, अशी टीका नारायण राणेंनी केली. यावेळी त्यांनी सरळ मार्गे सत्ता स्थापनेसाठी भाजप आजही आशावादी असल्याचं सांगितलं. देशात आमचं सरकार आहे. राज्यात आम्ही चांगलं सरकार देऊ शकतो एवढी ताकद भाजपमध्ये आहे, असंही नारायण राणे म्हणाले.

 

First Published on: July 3, 2020 9:39 PM
Exit mobile version