पंकजा मुंडेंना स्टेजवर आली चक्कर; खासगी रुग्णालयात केले दाखल

पंकजा मुंडेंना स्टेजवर आली चक्कर; खासगी रुग्णालयात केले दाखल

भाजप नेत्या पंकजा मुंडे

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. याच पार्श्वभूमीवर परळीतील टॉवर परिसरात भाजपच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, भाजप नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे भाषण करताना अचानक स्टेजवर कोसळल्या. प्रचारसभे दरम्यान ही घटना घडल्याने घटनास्थळी एकच धावाधाव झाली. सध्या पंकजा मुंडे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमके काय घडले?

विधानसभा निवडणूकीला अवघे दोन दिवस राहिले असून आज प्रचाराचा देखील शेवटचा दिवस होता. शेवटचा दिवस असल्यामुळे सकाळपासूनच पंकजा मुंडेंनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या. त्यांची शेवटची सभा ही परळीमध्ये होती. तसेच त्या सकाळी केवळ नाश्ता करुन बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे त्यांचे दिवसभर जेवण न झाल्याने त्यांना भोवळ आल्याचे सांगितले जात आहे. तसेच आता त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली आहे.


हेही वाचा – ‘चंपा’ शब्द भाजपच्या मंत्र्यानेच दिला, अजित पवारांचा गौप्यस्फोट


 

First Published on: October 19, 2019 7:37 PM
Exit mobile version