बार सुरु झालेले चालतात, शिष्यवृत्ती परीक्षेत फक्त कोरोना आडवा येतो का?, भाजपची टीका

बार सुरु झालेले चालतात, शिष्यवृत्ती परीक्षेत फक्त कोरोना आडवा येतो का?, भाजपची टीका

ओमिक्रॉनच्या नावावर अधिकृत गोष्टी बंद करुन अनधिकृतपणे लूट करण्याचा डाव, दरेकरांचा ठाकरे सरकारवर आरोप

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन अंतर्गत कोरोना निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांत राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात शिथिलता दिली आहे. राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार तसेच दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. राज्यातील इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या १२ ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र मुंबईतील शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय विभागाने घेतला आहे. यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेते आणि विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. रात्री १० वाजेपर्यंत बार सुरु असलेले चालतात मात्र शिष्यवृत्ती परीक्षेत कोरोना आडवा येतो का? असा प्रश्न दरेकर यांनी केला आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारच्या गोंधळामुळे राज्यातील जनता आणि पालक संभ्रमावस्थेत आहेत. सरकार’ आहे की,’सर्कस’? असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे. मुंबई शिक्षण उपसंचालकांचा आदेश आहे की, मुंबईत शिष्यवृत्तीची परीक्षा घ्या मात्र मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिका शाळांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होणार नाही असा आदेश दिला आहे. यामुळे मुंबईत संभ्रमाचे वातावरण तयार झालं होते. यानंतर मुंबईतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती परीक्षा मुंबईत होणार नाही असा निर्णय करण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे.

राज्यात ७ लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीची परीक्षा देतील परंतू राज्य सरकारच्या धोरण लकव्यामुळे मुंबईतील विद्यार्थ्यांची संधी हुकेल असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारला मुंबईत रात्री १० वाजेपर्यंत बार आणि मॉल सुरु झालेले चालतात मात्र शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी फक्त कोरोना आडवा येतो का? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारच्या धोरण लकव्यामुळे पालक आणि विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. शिक्षणाचा खेळखंडोबा करु नका अशी टीकाही प्रवीण दरेक यांनी केली आहे.

शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर आक्षेप

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत आहे. यामुळे शाळा सुरु करण्याच्या निर्णयापुर्वीच टास्क फोर्सचा सल्ला का घेतला नाही? राज्य सरकारच्या टोलवाटोलवीच्या धोरणामुळे त्रासले आहेत. जनतेची दिशाभूल करु नका, एकदाच ठोस निर्णय घेतला पाहिजे. तसेच काही दिवसांपुर्वी १५ टक्के शिक्षण फी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याच निर्णयाबाबतचा अध्यादेश काढायला नकार दिला? जनता आता या कोलांट्या उड्यांना त्रासली आहे. एक काय तो निर्णय घ्या अन्यथा जन उद्रेक होईल असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

First Published on: August 12, 2021 4:26 PM
Exit mobile version