शरद पवारांनी न्यायाधीश होऊ नये – सुधीर मुनगंटीवार

शरद पवारांनी न्यायाधीश होऊ नये – सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार आणि शरद पवार

मुंबईत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका पत्रद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती. पण आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत होम क्वॉरंटाईन असल्याचा दावा पवारांनी केला आहे. तसेच असे असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचे सांगत आहे, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला. याच पार्श्वभूमीवरून भाजप आमदार आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांना टोला लगावला आहे. शरद पवारांनी न्यायाधीश होऊ नये. चौकशी होऊ द्या, चौकशीला का घाबरताय?, असा सवाल त्यांनी केला आहे.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार? 

मुनगंटीवार म्हणाले की, ‘एखाद्या पोलीस विभागाच्या एसपीने लपवण्याचा प्रयत्न करत पत्रकार परिषद घ्यावी, तशी ही शरद पवारांची पत्रकार परिषद होती. १५ फेब्रुवारी ४ वाजून ४ मिनिटांचा अनिल देशमुखांचे ट्विट आहे. ज्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन देशमुख भारतरत्न लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर यांच्याविषयी चौकशी करण्याबाबत माहिती देत आहे. म्हणजेच क्वॉरंटाईन मधले अनिल देशमुख आणि पत्रकार परिषदेमधले अनिल देशमुख वेगळे आहे का? शरद पवारांसारखे नेते १५ तारखेला अनिल देशमुखांना कोरोना झाल्याचं सांगत असतील. तर ताबडतोब देशमुखांना अटक करावी लागले. कोरोना रुग्ण असताना पत्रकार परिषद घेणे हे कोरोनाच्या नियमांच उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांना अटक करून कोरोनाच्या संकटात जनतेला आदर्श घालून देण्याच्या दृष्टीने या ठिकाणी कृती केली पाहिजे.’


हेही वाचा – राज्यपालांनी राज्यातील परिस्थितीची माहिती राष्ट्रपतींना द्यावी – सुधीर मुनगंटीवार


 

First Published on: March 22, 2021 2:19 PM
Exit mobile version