अखेर गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अखेर गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुण्यातील भाजप खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. अखेर आज त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. (Bjp Mp Girish Bapat Funeral At Pune)

गिरीष बापट गंभीर आजाराने त्रस्त होते. मागील दीड वर्षांपासून गिरीष बापट आजारी होते. त्याचं पार्थिव शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अंत्यदर्शनासाठी सर्व राजकीय पक्षातील जेष्ठ नेते, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

बापटांच्या निधनाची बातमी भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. बापटांच्या अंत्यदर्शनासाठी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

सर्वसमावेशक नेता आणि भाऊ अशी त्यांची ओळख होती आणि पुण्यात त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. त्यांनी अनेक नेते घडविले, ते नगरसेवक, आमदार, खासदार मंत्री झाले तरी देखील सामान्यांशी असलेली नाळ त्यांनी कधीच तोडली नाही.

गिरीष बापट यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राज्यातील भाजपचे दिग्गज नेते हजर होते. हजारो कार्यकर्ते पाणावलेल्या डोळ्यांनी ‘गिरीश बापट अमर रहे’, अशा घोषणा देत होते. गिरीश बापट यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून आणि नात असा परिवार आहे.

किंगमेकर म्हणून खासदार गिरीश बापट यांची ओळख

कसबा पेठ विधानसभेतील किंगमेकर म्हणून खासदार गिरीश बापट यांची ओळख होती. ते मुळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. नगरसेवक पदापासून स्वतःच्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली. पुढे १९९५ साली पहिल्यांदा त्यांनी आमदारकीची निवडणूक लडवली. त्यानंतर सलग पाच वेळा ते कसबा पेठेत आमदार म्हणून राहिले.

१९९६ साली गिरीश बापटांनी लोकसभेसाठीही नशिब आजमावलं होतं. परंतु, त्यावेळी त्यांचा पराभव झाला. परंतु, २०१९ मध्ये त्यांनी लोकसभेसाठी पुन्हा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे मोहन जोशी यांचा तब्बल ९६ हजार मतांनी पराभव केला.


हेही वाचा – आम्ही वाट पाहतोय… 2024मधील विरोधी पक्षांच्या भूमिकेवर नितीश कुमारांनी दिले संकेत

First Published on: March 29, 2023 9:09 PM
Exit mobile version