…यालाच दंश करणं म्हणतात, भाजपचा राऊतांवर पलटवार

…यालाच दंश करणं म्हणतात, भाजपचा राऊतांवर पलटवार

मोदींच्या नावाने मतं मागितली आणि निवडून आल्यावर पाठीत खंजीर खुपसला यालाच दंश करणं, दुष्टपणा करणं असं म्हणतात, केशव उपाध्येंची राऊतांवर टीका

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विषारी साप म्हणून संबोधले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यावर संजय राऊत यांनी साप संबोधणं चुकीचं नसल्याचं म्हटलं. तसचं, सामनाच्या अग्रलेखातूनही पंतप्रधानांवर खोचक टीका करण्यात आली. आता याप्रकरणावर भाजपने राऊतांवर पलटवार केला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे. ( BJP Spoke person Keshav Upadhye Taunted Sanjay Raut over Snake Matter  )

केशव उपाध्येचं ट्वीट काय?

संजय राऊत महाराष्ट्रात सापाच्या पिल्लाला 30 वर्षे दूध पाजलं म्हणता, विषारी म्हणता, भाजपच्या जीवावर मोठे झाला आहात. मोदींच्या नावाने मत मागताना हे आठवलं नाही का? मोदींच्या नावाने मतं मागितली आणि निवडून आल्यावर पाठीत खंजीर खुपसला यालाच दंश करणं, दुष्टपणा करणं असं म्हणतात. भाजपा आणि मोदींना जनेतेने लोकशाही पद्धतीने निवडणून दिलं आहे. काँग्रेसच्या गळ्यात जरुर पडा पण ते पडण्यासाठी कोणत्याही गोष्टीचं समर्थन करु नका, काँग्रेस अध्यक्षांनी माफी मागितली आहे, तुम्ही तेवढेही संवेदनशील नाहीत याची जाणीव आहे, अशा शब्दांत भाजपचे केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांचा समाचारा घेतला आहे.

सामनाच्या अग्रलेखात काय?

शंकराने विष पचवले म्हणून तो निलकंठ झाला. कोही लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णू आणि शंकराचे अवतार वाटतात. मग साप गळ्यात घालून विष पचवणाऱ्या शंकारशी तुलना होताच राजकीय तांडव करण्याची गरज काय? असा सवाल करत त्यांनी भाजपच्या जिभांतील विषामुळे आपल्या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य गतप्राण झाले आहे, असं म्हटलं आहे. न्यायालये, संसद आणि सर्व घटनात्मक संस्थांना सापांचा विळखा पडला आहे. लोकशाहीच्या नावाने मोदी रोज पुंगी वाजवतात. त्यावर अंधभक्त डोलतात. जे डोलत नाहीत त्यांना देशद्रोही ठरवून छळलं जात असल्याची टीका सामानातून करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेृत्त्वात भाजपने विषाचा महायज्ञ मांडला आहे. भाजपचे लोक देशद्रोही फुत्कार सोडत असल्याची टीकाही करण्यात आली आहे.

( हेही वाचा: ‘येऊ दे कोकणात मग दाखवतो’; ‘जैतापूर प्रकल्पा’वरुन नारायण राणेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप )

First Published on: April 29, 2023 3:14 PM
Exit mobile version