शरद पवारांनी विकास केला असेल तर उपकार नाही केले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

शरद पवारांनी विकास केला असेल तर उपकार नाही केले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

नाशिक – बारामती मतदासंघ महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे अन्य मतदारसंघाप्रमाणे भाजपाने तिथे लक्ष केंद्रित केला आहे. या ठिकाणी केवळ मी भेट देणार म्हटल्यावर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी माजी ‘कुळे’ काढली. यामुळे मी आता तीन महिन्याला या मतदारसंघाला भेट देणार असून 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत घडी बंद पडेलच असा पुरुच्चार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

बारामती मध्ये जर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी विकास केला असेल तर उपकार नाही केले. 40 -40 त्यांना निवडून दिले जात आहेत त्यामुळे मतदार संघाचा विकास करणे कर्तव्य आहे असेही बावनकुळे म्हणाले. यावेळी त्यांनी नाना पटोलेंच्या टीकेला उत्तर दिले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसमध्ये यावे हे त्यांचे विधान हास्यस्पद असून  पटोलेंनी पहिले आपले स्वतःचे स्थान सांभाळावे, असा टोला त्यांनी  पटोलेंना लगावला.

पृथ्वीराज चव्हाण हे भाजपाच्या संपर्कात असल्याचा इन्कार करत बावनकुळेंनी पक्षांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना योग्य वागणूक दिली जात नाही असे सांगितले. पक्षातील काही चुकीच्या गोष्टींवर बोलल्यामुळे त्यांना विधिमंडळातही चौथ्या पाचव्या रांगेत बसवण्यात येते. मुख्यमंत्री असलेल्या नेत्याला अशा प्रकारची वागणूक देणे योग्य नाही भाजपात असे कधी होत नाही, असेही ते म्हणाले. मात्र, पृथ्वीराज चव्हाण हे नाराज आहेत म्हणून त्यांनी पक्षावर काही टीका केली तर ते भाजपाचे संपर्कात आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही असेही बावनकुळे म्हणाले.

First Published on: September 11, 2022 3:44 PM
Exit mobile version