राज ठाकरेंच्या भाषणावर भाजपचा प्रभाव, त्यांनी मुळ शैली जपावी : रोहित पवार

राज ठाकरेंच्या भाषणावर भाजपचा प्रभाव, त्यांनी मुळ शैली जपावी : रोहित पवार

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतःच्या भाषणाची मुळ शैली जोपासली पाहीजे. परंतू कालच्या त्यांच्या भाषणावर भाजपचा प्रभाव असल्याचे दिसून येत असल्याची टिका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. नाशिक येथे कृषीथॉन प्रदर्शनाला भेट दिली असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पवार म्हणाले, मी स्वतः राज ठाकरेंचा चाहता आहे. रविवारी त्यांचे भाषण ऐकले. आपल्या भाषणात राज ठाकरे स्वतःची मुळ शैली राखण्याचा प्रयत्न करत होते मात्र मधेच कुठेतरी त्यांच्या भाषणावर भाजपचा प्रभाव असल्याचे दिसून आले. त्यांची मुळ शैली मला भावते तीच लोकांनाही भावते. मात्र कालच्या भाषणात मुळ शैली थोडीथोडी दिसत होती. त्यामुळे यापुढे तरी ते आपली मुळ शैली जोपासतील. सामान्य लोकांचे विषय हे त्यांच्या भाषणाचा मुददा असेल. कुठलाही भेदभाव न करता लोकांच्या हिताकरीता लढणे तेच त्यांच्या भाषणातून येत्या काळात दिसेल अशी अपेक्षा मी करतो असे ते म्हणाले. सध्या राज्यात राजकारणाची पातळी खालावली असल्याची टिकाही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये ज्योतिषाला हात दाखवल्याचे बोलले जाते. मला असे वाटते कुणी काय दाखवावे हा त्यांचा विषय आहे. पण लोकहिताचे निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. त्यामुळे हात दाखवण्यापेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आवश्यक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आज अनेक युवक हाताला काम मागत आहे. त्या हातांकडे बघून काम देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

First Published on: November 28, 2022 8:28 PM
Exit mobile version