पुण्याच्या शिरुमध्ये अंधश्रद्धेचा थरार!

पुण्याच्या शिरुमध्ये अंधश्रद्धेचा थरार!

फोटो व्हिडिओमधून

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधल्या मलठण गावात अंधश्रद्धेचा एत किळसवाणा प्रकार पाहायला मिळाला. मलठण गावाच्या बाजूलाच असणाऱ्या एका ओढ्याजवळ रात्रीच्या सुमारास कापलेली लिंबं, पूजा केलेले दगड आणि काळ्या बाहुल्या तसंच जादुटोण्याचं इतर साहित्य आढळून आलं. याशिवाय त्याठिकाणी झाडावर टांगलेला एक कागदही मिळाला ज्यावर काही लोकांची नावं लिहीली होती. त्या कागदावर स्थानिकांना रक्ताचे काही डागही आढळले. दरम्यान हा जादू-टोण्यातून करण्यात आलेला प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच संपूर्ण गावात खळबळ पसरली. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष नंदीनी जाधव यांनी थेट मलठण गाठले आणि हा सर्व अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे तेथील नागरिकांसमोर उघड केले. यावेळी त्यांनी झाडाजवळ आढलेले अंधश्रद्धेचे सर्व साहित्यही जाळून टाकले.

शिरुरच्या मलठण गावामध्ये पोहचताच तिथे काही उतारे टाकल्याचं आढळून आलं. या उताऱ्यांमुळे गावामध्ये खूपच दहशीतचं वातावरण निर्माण झालं होतं. याशिवाय तिथे मिळेल्या चिठ्ठीवर सरपंच आणि त्यांच्या ५ ते ६ कुटुंबियांची नावं लिहिलेली होती. या प्रत्येक नावावर रक्ताचे थेंब होते. ही बातमी कळताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती (पुणे शाखा)चे काही कार्यकर्ते आणि मी त्याठिकाणी पोहोचलो. त्यानंतर या सर्व अघोरी प्रकाराबाबत आम्ही गावकऱ्यांचे प्रबोधन केले. हा अंधश्रध्देचा प्रकार असून कुणीही याला बळी पडू नये असेही आम्ही त्यांना सांगितले. – नंदीनी जाधव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष 

नावं लिहिलेली आणि रक्ताचे डाग असलेली चिठ्ठी
घटनास्थळी मिळालेली जादू-टोण्याच्या सामानाची पिशवी

वाचा : ‘त्या’ २२ वर्ष दबल्या होत्या ‘जटां’च्या अंधश्रद्धेखाली

First Published on: September 24, 2018 8:28 PM
Exit mobile version