नवे संकट! राज्यात ६ दिवस पुरेल एवढाच रक्त साठा शिल्लक

नवे संकट! राज्यात ६ दिवस पुरेल एवढाच रक्त साठा शिल्लक

राज्यात कोरोना संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. असे असताना राज्यासमोर आणखी एक नवे संकट उभे राहिले आहे. मुंबईसह राज्यात पुढील ५ ते ६ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. राज्यात कोरोना काळात रक्तदानाच्या साठ्यात मोठ्याप्रमाणात घट होत आहे. यात महत्त्वाच्या शस्त्रक्रियांसाठी लागणारी रक्ताची मागणी पुर्ण करण्यास अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन शिंगणे यांनी केले आहे.

राजेंद्र शिंगणे यांनी आज मुंबईसह राज्यातील रक्त साठ्याबाबत आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिंगणे म्हणाले की, आज मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणाच्या ब्लड बँकांचा आढावा घेतला. यात पुढील ५ ते ६ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. यात राज्यात कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून रक्त पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी रक्तदानासाठी पुढे यावे. नियमित रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. यामध्ये राजकीय नेते, रुग्णालये आणि विविध सामाजिक संघटनांनीही रक्तदानासाठी पुढाकार घेत रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.


हेही वाचा- ऑनलाईन ड्रायव्हिंग लाइसन्स काढताय ? प्रक्रियेत वाढले आणखी टप्पे


 

First Published on: April 1, 2021 5:54 PM
Exit mobile version