BMC Election: मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? ‘हे’ आहे कारण

BMC Election: मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? ‘हे’ आहे कारण

संग्रहित छायाचित्र

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणखी लांबण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभेची जी निवडणूक झाली त्यात कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला एकहाती विजय मिळवून दिला. तसचं, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्याविषयी लोकांच्या मनात सहानुभूती आहे. त्यामुळे आता जर निवडणुका झाल्या तर कल ठाकरेंच्या बाजूने जाण्याची शक्यता असल्यानं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात. ( BMC polls may be pushed to 2024 as sympathy wazve now for Uddhav Thackeray sena )

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबमध्ये होणार होत्या. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरेंबाबत लोकांमध्ये सहानुभूती आहे त्यामुळे ही सहानुभूतीची लाट ओसरण्याची आणि महाविकास आघाडी तुटण्याची वाट शिंदे-फडणवीस सरकार पाहत आहे. त्यामुळे आता या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेवर निर्माण केलेले प्रश्नचिन्ह आणि त्यांच्यावर कडक शब्दांत ओढलेले ताशेरे तसचं, शिंदे गटाचे व्हीप भरत गोगावले यांना सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवल्याने मुंबई महानगरपालिका निवडणुका आता घेण्यासाठी भाजप तयार नाही.

राज्यात जवळपास 23 महापालिका गेल्या 2 वर्षांपासून प्रशासकाद्वारे चालवल्या जात आहेत. आधी कोरोनामुळे आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षण काढून घेतल्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

पक्षांतर करण्याच्या तयारीत 

महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जून 2022 ला आले. या सत्ता बदलावरुन सर्वोच्च न्यायालयात वाद सुरु होता. या संघर्षामुळे राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या होत्या. बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली,उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत.

( हेही वाचा: राजपूत समाजासाठी यापुढे ‘भामटा’ शब्द वापरला जाणार नाही : मुख्यमंत्री शिंदे )

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्याने आणि निवडणुका होण्याची शक्यता असल्याने आता अनेकजण पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. माजी नगरसेवक, पदाधिकारी व इच्छुक इकडून तिकडे जाऊन शकतात. सहाजिकच सत्ताधारी भाजव आणि शिवसेनेत ( शिंदे गट) प्रवेश करण्याचा अनेकांचा कल असले. त्यादृष्टीने व्यूहरचना तयार करुन आपलं तिकीट फिक्स करण्यात अनेकजण गुंतले आहेत.

First Published on: May 15, 2023 8:00 AM
Exit mobile version