करण जोहरची पार्टीतून कोरोनाचा विस्फोट; अनके सेलिब्रिटींसह 55 जणांना लागण

करण जोहरची पार्टीतून कोरोनाचा विस्फोट; अनके सेलिब्रिटींसह 55 जणांना लागण

अलीकडेच बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी अनेक सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सांगितले की, करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. या लोकांना ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या बी 5 आणि बी 6 व्हेरिएंटचा संसर्ग झाला असून जो वेगाने पसरत आहे. (karan johar birthday party had covid blast left 50 55 guests infected with covid 19)

मिळालेल्या माहितीनुसार, करण जोहरच्या पार्टीत सहभागी झाल्यानंतर शाहरुख खान, कतरिना कैफ, आदित्य रॉय कपूर आणि कार्तिक आर्यन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान या पार्टीत सहभागी असलेल्या सुमारे 50-55 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त आहे. मुंबईतील अंधेरी वेस्ट येथे आयोजित या पार्टीला हृतिक रोशन, शाहरुख खान, कतरिना कैफ, कियारा अडवाणी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा आणि करीना कपूर खान यांसारख्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. (covid karan johar)

करण जोहरच्या या धमाकेदार पार्टीत सहभागी लोकांना आता मोठी किंमत मोजावी लागली आहे. करण जोहरच्या या ग्रँड पार्टीत पाहुणे म्हणून आलेल्या 50 ते 55 लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. मात्र हे स्टार्स बदनामीच्या भीतीने कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचे उघड करत नाहीत.

प्रसार माध्यमांशी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असल्याचे नमूद केले आहे. यावेळे टोपे म्हणाले की, राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात येतेय. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बूस्टर डोस अनिवार्य करण्याचा विचार करण्याची विनंती केली आहे, जो आता ऐच्छिक आहे. दरम्यान मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह 6 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

ते म्हणाले की, या जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचणी वाढवण्यात आली आहे. लोकांना मास्क घालण्यासह कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे रविवारी मुंबईत कोरोनाचे 961 रुग्ण आढळले. यादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यूही झाला. यासह महाराष्ट्रातील कोरोनाची एकूण संख्या 10,68,936 वर पोहोचली आहे, तर मृतांचा आकडा 19,569 वर पोहोचला आहे.


स्पृहा जोशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; मीडियम स्पाइसीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण भूमिका

First Published on: June 6, 2022 9:52 PM
Exit mobile version