मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोटांच्या धमकीचा फोन, पोलिसांकडून तपास सुरू

मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोटांच्या धमकीचा फोन, पोलिसांकडून तपास सुरू

मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबईतील जुहू आणि अंधेरीसह सहारा हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचा निनावी फोन मुंबई पोलिसांना आल्यानंतर मुंबईत खळबळ उडाली आहे. (bomb blast threat call in Mumbai police investigating)

मिळालेल्या माहितीनुसार, या धमकीच्या फोननंतर पोलिसांनी या तिन्ही ठिकाणी तातडीने तपासकार्याला सुरुवात केली आहे. तसेच, हा धमकीचा फोन कुणी केला याची चौकशी केली जात आहे. ज्या व्यक्तीनं मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईनवर फोन करून बॉम्बस्फोटाची धमकी दिली आहे, त्याचं नाव अजून समोर आलेलं नाही. मात्र या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

मुंबई पोलिसांना 112 या हेल्पलाईनवर मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. मंगळवारी रात्री 10:30 वाजता एका अज्ञाताने फोन केला होता. त्यानंतर, मुंबई पोलिसांसह सीआयसीएफ आणि बीडीडीएस यांनी तिन्ही ठिकाणी तपास केला. मात्र, त्या ठिकाणी कोणताही संशयास्पद अथवा स्फोटकं असलेली वस्तू मिळाली नाही. पोलिसांचा तपास अद्याप सुरु आहे.

या धमकी देणाऱ्या आरोपीने अंधेरीतील इनफिनिटी मॉल, जुहूमधील पीव्हीआरसह सहारा हॉटेल विमानतळावर बॉम्बस्फोट बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहारा विमानतळ पोलीस, जूहू, अंबोली आणि बांगूरनगर पोलिसांसह सीआयसीएफ आणि बीडीडीएसच्या पथकानं शहरातील अनेक ठिकाणी तपास सुरू केला आहे.

या ठिकाणी अधिक तपास केला असता, तपास यंत्रणांना अद्याप कोणतीही स्फोटके अथवा संशयास्पद वस्तू आढळून आलेल्या नाहीत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीही मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती.


हेही वाचा – एसटी कर्मचारी-अधिकाऱ्यांना सरसकट 5000 रुपये दिवाळी बोनस जाहीर

First Published on: October 19, 2022 6:34 PM
Exit mobile version