९ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

९ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

९ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. १९९६ साली झालेल्या बालहत्याकांडप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या रेणुका शिंदे आणि सीमा गावित बहिणींना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु तब्बल २० वर्षानंतर फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली असून मुंबई उच्च न्यायालयाने गावित बहिणांना मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली होती. २०१४ साली भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सुद्धा या शिक्षेवरती शिक्कामोर्तब केला होता. परंतु प्रशासनाने त्यांना शिक्षा सुनावण्यासाठी दिरंगाई केली. त्यामुळे गावित बहिणींची आता जगण्याची उमेद वाढली असून जगण्याचा अधिकार मुलभूत रहायला हवा, यासाठी गावित बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दोन्ही बहिणींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर यावरती सविस्तर सुनावणी पार पडली. राज्य सरकारने पुन्हा एकदा आपला पाठिंबा प्रबळ ठेवत या दोन्ही आरोपी बहिणींना फाशीची शिक्षाचं योग्य आहे. असं राज्य सरकारने कोर्टाला सांगितलं होतं. मात्र, या दोन्ही बहिणींना फाशीची शिक्षा देणं योग्य वाटते. तर प्रशासनाकडून इतकं वर्ष दिरंगाई का करण्यात आली, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारसमोर उपस्थित केला आहे. मात्र, याचं उत्तर अद्यापही राज्य सरकारकडून देण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे ही याचिका स्वीकारत उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द करत या दोन्ही बहिणींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

९० च्या दशकातील प्रकरण काय?

९० च्या दशकात राज्यातील १९९० ते १९९६ या सहा वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या काही भागांतून लहान मुलं अचानक गायब होऊ लागली. ही मुलं कुठे गायबं होत होती आणि कुठे होती?, याबाबतचा कुणालाही पत्ता नव्हता. लहान मुलं आपल्या आई-वडीलांसोबत असताना अचानक गायब होऊ लागली. परंतु अंचनाबाई गावित ही एक महिला होती. त्या महिलेच्या दोन मुली होत्या. एकीचं नाव रेणूका आणि दुसरीचं सीमा असं होतं. या मायलेकी मिळून लहान मुलांचं अपहरण करायच्या. त्यानंतर त्यांच्याकडून भीक मागायला लावायच्या आणि जबदस्तीने त्यांना भीक लावण्याच्या कामात गुंतवत असत. त्यानंतर भीक मागणाऱ्या मुलांकडून जो काही पैसा यायचा त्यावर या मायलेकींचा उदरनिर्वाह चालत असे.

ही घटना अनेक वर्षांपासून सुरू होती. जवळपास १३ बालकांचं अपहरण करण्यात आलं. मात्र, मुलं ज्याप्रमाणे मोठी होऊ लागली. तेव्हा ती मुलं त्यांना याबाबत प्रश्न विचारत असत. त्यामुळे संतापाच्या भरात मायलेकींनी मिळून निर्दयीपणे नऊ मुलांची हत्या केली.

रेणूका शिंदेंचं लग्न झाल्यानंतर तिचा पती किरण शिंदे सुद्धा या गुन्ह्यामध्ये सामील होता. परंतु त्यांच्यामध्ये पैशांवरून वाद झाले होते. यानंतर रेणूका शिंदेचा पती माफीचा साक्षीदार झाला. त्यामुळेच हा संपूर्ण भयानक प्रकार लोकांच्या समोर उघडकीस आला. पोलिसांनी या तिन्ही जणांना अटक केली. मात्र, खटल्यादरम्यान अंजनाबाई गावित यांचा मृत्यू झाला आणि दोन्ही बहिणींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी होण्यासाठी २० वर्ष उलटली. अद्यापही त्यांना फाशीची शिक्षा झालेली नाहीये. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाच्या दिरंगाईमुळे फाशीची शिक्षा रद्द करत या दोन्ही बहिणींनी मरेपर्यंत जन्मठेप सुनावली आहे.


हेही वाचा : Virat Kohli Test Captaincy: तू माझा मोठा भाऊ…विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर मोहम्मद सिराज झाला भावूक


 

First Published on: January 18, 2022 1:25 PM
Exit mobile version