राज्याच्या अर्थसंकल्पाला अजितदादांचा बुस्टर डोस?

राज्याच्या अर्थसंकल्पाला अजितदादांचा बुस्टर डोस?

अजित पवार

जागतिक आर्थिक मंदीचे काळे सावट, नोटबंदीचे गंभीर परीणाम, जीएसटीमुळे घटलेले राज्याचे उत्पन्न तसेच केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या उत्पन्नाचे कमी झालेले प्रमाण यामुळे राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प कठोर आर्थिक शिस्तीचे धडे देणारा असल्याचे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. आज राज्याचा अर्थ संकल्प विधीमंडळात सादर करण्यात येणार आहे. राज्याला तब्बल ४० हजार कोटींची महसूली तूट असून त्यामुळे उद्याचा अर्थसंकल्प हा तुटीचा अर्थसंकल्प असेल अशी शक्यता आहे.


हेही वाचा – विवस्त्र करुन मारहाण करण्याच्या व्हिडिओमागे ‘त्या’ दाम्पत्याचा हात

ठाकरे सरकारचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याची बिघडलेली आर्थिक स्थिती पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही कठोर उपाययोजना या अर्थसंकल्पात मांडण्याची शक्यता आहे. राज्यातील मागील पाच वर्षे सत्ते असलेल्या भाजपाप्रणित देवेंद्र फडणवीस सरकारने मोठ्याप्रमाणावर योजनेतर खर्च केले असून त्याचा मोठा बोजा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर पडला आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काही अवाजवी योजना तसेच प्रकल्पांना याचा फटका बसण्याची भिती व्यक्त होत आहे.

 

First Published on: March 5, 2020 8:53 PM
Exit mobile version