सीमावाद चिघळला, कर्नाटकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरचे दहन

सीमावाद चिघळला, कर्नाटकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरचे दहन

बेळगाव – महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद विकोपाला पोहोचलेला असताना कर्नाटकमधील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी वाढलेली दिसतेय. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचं कार्यकर्त्यांनी गदगमध्ये दहन केलं आहे. त्यामुळे कर्नाटकात वाद अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा राज्यपालांविरोधातील आंदोलनात शिवप्रेमींना एकत्र येण्याचे उद्धव ठाकरेंचे आवाहन, उदयनराजे म्हणतात…

कर्नाटक आणि महाराष्ट्राती सीमावादावरून गेल्या काही दिवासंपासून वादंग निर्माण झाला आहे. कर्नाटकात महाराष्ट्रविरोधी वातावरण निर्माण झाल्याने सीमावादाचा प्रश्न केंद्राने सोडवावा अशी मागणी मविआच्या खासदारांनी केली आहे. त्यासंदर्भात सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी आज अमित शाहा यांची भेट घेतली असून अमित शाहा दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी १४ डिसेंबरला चर्चा करणार आहेत.

हेही वाचा – चर्चेत राहण्यासाठी कंड्या पिकवू नका, मनसेने खासदार संजय राऊत यांना सुनावले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचं दहन केल्याने कर्नाटकातील मराठी भाषिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसंच, मराठी भाषिक भागात महाराष्ट्रविरोधी लोकांच्या भावना भडकवल्या जात असल्याचाही आरोप करण्यात येतोय. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी गदगमध्ये महाराष्ट्राविरोधात जोरदार निर्दशने केली आहेत. महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर चढून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा – राज्यपालांविरोधात उदयनराजे भोसले आणखी आक्रमक; थेट पंतप्रधानांनाच पाठवलं पत्र

कोल्हापुरात जमावबंदी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी कोल्हापुरात पुढील १५ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असून आदेशाविरोधात जाणाऱ्यांवर कलम १४४ चा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी हे आदेश जारी केले आहेत. या काळात मिरवणुका आणि सभांनाही मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा – सीमावाद : कोल्हापुरात जमावबंदीचे आदेश, खासदार भेटणार अमित शाहांना

महामोर्चाचे आयोजन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपच्या अन्य नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज तसेच राज्याच्या इतर मानबिंदूंवर करण्यात आलेली अवमानकारक वक्तव्ये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रद्रोही विधान आणि
कर्नाटकविरोधात राज्य सरकारने घेतलेली नेभळट भूमिका, राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये नेण्याचे कट कारस्थान तसेच वाढती बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नावर राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे येत्या १७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा अतिविराट महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. हा मोर्चाचा पहिला टप्पा आहे. यानंतरही सरकार ऐकणार नसेल तर टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जाईल, असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे.

First Published on: December 9, 2022 12:38 PM
Exit mobile version