मेट्रो कामामुळे पुण्यात नगर रस्त्यावरील बीआरटी बंद!

मेट्रो कामामुळे पुण्यात नगर रस्त्यावरील बीआरटी बंद!

येरवाडा ते विमाननगर कॉर्नर या बीआरटी मार्गावरून बस संचलन बंद असणार आहे. (सौजन्य : The Indian Express)

मेट्रोचे काम सुरू होत असल्याने पुण्यात नगर रसत्यावरील येरवडा ते विमाननगर कॉर्नर या बीआरटी मार्गावरून बसचा मार्ग बंद करण्यात येणार आहे. १८ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम सुरू झाले असून, रस्त्यावरचा काही भाग मेट्रो कामासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. नगर रस्त्यावरील येरवडा ते विमाननगर कॉर्नर या दरम्यान १८ नोव्हेंबरपासून मेट्रो मार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येरवडा चौक ते विमाननगर कॉर्नर यादरम्यान बीआरटी मार्गवरील बस वाहतूक बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रशासनाकडून देण्यात आली.

या कालावधीमध्ये बस सेवा मुख्य रसत्यावरून सुरू ठेवली जाईल. त्यासाठी खास बस थांबे उभारण्यात येणार आहेत. या तीन किलोमीटर अंतरामधील येरवडा, गुंजन कॉर्नर, वाडिया बंगला, शास्त्रीनगर, रामवाडी जकात नाका, वडगाव शेरी फाटा ही बीआरटी स्थानके बाधित असणार आहेत.

First Published on: November 17, 2018 6:05 PM
Exit mobile version